High Blood Pressure असणाऱ्यांनी आजच 'ही' फळं खाण्यास सुरुवात करा, रक्तदाब पूर्ववत झालाच म्हणून समजा

सर्वाधिक धोका वाढत आहे तो म्हणजे उच्च रक्तदाबाचा. 

Updated: Jun 10, 2022, 07:51 AM IST
High Blood Pressure असणाऱ्यांनी आजच 'ही' फळं खाण्यास सुरुवात करा, रक्तदाब पूर्ववत झालाच म्हणून समजा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

High Blood Pressure Diet: धकाधकीच्या या आयुष्यात बऱ्याचजणांच्या शारीरिक तक्रारी लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. बिघडलेल्या आहाराच्या सवयींमुळे आणि अपुरी झोप मिळाल्यामुळे आरोग्य ढासळू लागलं आहे. अशा परिस्थितीत सर्वाधिक धोका वाढत आहे तो म्हणजे उच्च रक्तदाबाचा. 

हृदयविकार आणि ब्रेनस्ट्रोक यांसारख्या आघातांना कारणीभूत असणाऱ्या या हाय बीपी अर्थात उच्च रक्तदाबाला दूर ठेवण्यासाठीच सर्वजण प्रयत्नशील आहेत. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात काही महत्त्वाचे बदल करणं नेहमीच आवश्यक असतं. 

दैनंदिन सवयीमध्ये अग्रस्थानी येतात त्या म्हणजे आहाराच्या सवयी. उच्च रक्तदाब असणाऱ्या मंडळींनी काही फळांचा समावेश त्यांच्या आहारात केल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकते. 

1. कलिंगड (Watermelon)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे फळ जास्त प्रमाणात खाल्लं जातं. पण, एरव्हीसुद्धा या फळाचा आहारात समावेश करणं फायद्याचं ठरतं. यामध्ये पोटॅशियम, विटामिन सी, विटामिन ए, लाइकोपीन आणि अमीनो अॅसिड असे घटक असल्यामुळे ते उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी औषधाहून कमी नाही. 

2. स्ट्रॉबेरी (Strawberry)
या फळामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्यातून शरीराला ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि विटामिन सी असे महत्त्वाचे घटक मिळतात. यामध्ये असणारं पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. 

3. केळं (Banana)
ओमेगा 3 फॅटी अॅसिड, पोटॅशियम आणि फायबर यांसारखे बरेच घटक केळ्यामध्ये असतात. रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी याची मदत होते. 

4. किवी (Kiwi)
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी किवी फळ जरुर खावं. या फळामध्ये असणारे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक शरीराला कमाल फायदा देतात. 

5. रताळं (Sweet Potato)
सहसा उपवासाच्या दिवसांमध्ये खाल्लं जाणारं हे कंदमूळ उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी फायदेशीर. यामध्ये असणारे सॉल्युबल फायबर (Soluble Fiber), बीटा कॅरोटीन आणि कॅल्शियम हे घटक बरीच मदत करतात. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांतून घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )