थंडीत तुम्हालाही फाटलेल्या ओठांची समस्या जाणवते.. तर आजच करा 'हे' उपाय

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता. 

Updated: Oct 30, 2022, 09:51 PM IST
थंडीत तुम्हालाही फाटलेल्या ओठांची समस्या जाणवते.. तर आजच करा 'हे' उपाय title=
You also feel the problem of chapped lips in winter remedy today nz

How to Heal Chapped Lips: थंडीची चाहूल लागली आहे. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी होते. त्यामुळे हात-पाय कोरडेपणा आणि ओठ फाटणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे आपण महागड्या प्रोडक्ट्स वर खर्च करतो पण निकाल मात्र तसा मिळत नाही ज्याची आपण अपेक्षा करत असतो. आज आपण फाटलेल्या ओठांची समस्या कशी दूर करावी याबद्दल बोलत आहोत. जर तुम्ही फाटलेल्या ओठांच्या समस्येने त्रस्त असाल तर आजचा लेख याच विषयावर आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता. (You also feel the problem of chapped lips in winter remedy today nz)

हे ही वाचा - आंघोळी करताना 'या' गोष्टींचा करा वापर...परफ्यूमची भासणार नाही गरज 

फाटलेल्या ओठांसाठी घरगुती उपाय

1. तुम्ही टोमॅटोवर साखर टाका आणि नंतर हळू हळू ओठ स्क्रब करा, असे केल्याने ओठांची डेड स्किन निघून जाईल आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून आराम मिळेल.

2. तुपाच्या वापराने ओठ फुटण्याच्या समस्येवरही मात करता येते. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी नियमितपणे ओठांवर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. असे केल्याने ओठ मऊ राहतील.

हे ही वाचा - Halloween Party मध्ये Ananya Panday दिसली 'या' अवतारात...

3. ऑलिव्ह ऑईल ही समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल ओठांवर लावा. असे केल्याने ओठ मऊ दिसतील.

4. तुम्ही ओठांवर कोणतेही उत्पादन वापरत असाल तर ते लावल्यानंतर ओठांवर मॉइश्चरायझर जरूर लावा. फाटलेल्या ओठांच्या समस्येपासूनही मधाच्या सेवनाने आराम मिळतो. अशा परिस्थितीत मध आणि लिंबाचा रस चांगले मिसळा आणि ओठांवर 15 मिनिटे लावा. असे केल्याने काळ्या ओठांची समस्या देखील टाळता येते.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)