औषधगोळ्यांशिवाय मूळव्याधीचा त्रास हमखास दूर करणारे खास '6' उपाय

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. 

Updated: Jun 19, 2018, 10:41 AM IST
औषधगोळ्यांशिवाय मूळव्याधीचा त्रास हमखास दूर करणारे खास '6' उपाय  title=

मुंबई : मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. या आजाराबाबत समाजात खुलेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे अनेकजण हा त्रास आयुष्यभर सहन करतात. मूळव्याधीचा त्रास असह्य झाल्यास अनेकांना शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते. मग पहा या  वेदनादायी समस्येवर योगासनांच्या मदतीने कसा मिळवाल आराम ?  

मूळव्याधीवर फायदेशीर योगासनं 

अर्ध्यमत्येंद्रासन - या आसनामध्ये पचन संस्थेचे कार्य सुधारते. पोटाजवळील डिसकम्फर्ट कमी होतो. शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते.या अवस्थेमध्ये किमान 5 मिनिटे बसा.

बलासन - या आसनामुळे गुद्दवाराजवळील रक्तप्रवाह सुधारतो. या आसनामध्ये नियमित किमान मिनिटभर बसा.

मलासन - अनेकदा बद्धकोष्ठतेच्या त्रासामधून मूळव्याधीचा त्रास निर्माण होतो. या आसनामुळे पाठीचा कणा, कंबर, पार्श्वभाग यांना मजबूती देते. तसेच पचनमार्गाचे कार्य सुधारते. या आसनामध्ये शक्य तितका वेळ (अंदाजे 8-10 श्वास ) बसा.

पवनमुक्तासन - या आसनामध्ये पोटावर हलकाच दाब येतो. त्यामुळे पोटात साठलेला वायू बाहेर पडतो. यामुळे त्या भागाजवळील स्नायूंवरील ताण कमी होतो. 5-6 सेकंद या अवस्थेमध्ये रहा.

सर्वांगासन - या आसनामुळे पोटाजवळील आणि गुद्द्वाराजवळील रक्तपुरवठ्याला चालना मिळते. त्यामुळे पाचक रसांचा प्रवाहही सुधारतो. या आसनामध्ये 10 सेकंद रहा आणि पुन्हा हळूहळू पूर्वस्थितीत या.

विपरित करणी - या आसनामध्ये भिंतीला समांतर केलेले पाय गुद्द्वाराला होणारा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे मूळव्याधाची लक्षण कमी होण्यास मदत होते. तसेच शौचाच्या जागी असलेला ताण कमी होतो.

यासोबतच मूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय