Worst food for cancer: सावधान! आजपासून 'हे' 5 पदार्थ खाणं बंद करा, अन्यथा...

Cancer and food : तुमच्या आहारात जर हे जीवघेणे पदार्थांचा समावेश असेल तर आताच बंद करा, कारण या पदार्थांमधून कॅन्सरचा धोका जास्त प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे.

Updated: Jan 23, 2023, 04:26 PM IST
Worst food for cancer: सावधान! आजपासून 'हे' 5 पदार्थ खाणं बंद करा, अन्यथा... title=

Cancer and food: रोजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात लोकांचं त्यांच्या तब्बेतीकडे आणि जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. अनेकदा भूक भागवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी जंक फूडचा (Junk food) आधार  घेतात. परंतु हेच जंक फूड अनेक आजारांतं कारण बनत आहे. सध्या कमी वयातच महिला आणि पुरूष वर्गाला भयानक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातीलच एक मुख्य आणि गंभीर आजार म्हणजे कॅन्सर (Cancer news in marathi). हा आजार शरीरातील विविध अवयवांवर होतो. कोणत्याही एका अवयवापासून सुरू होणारा हा आजार जर वेळीच उपचार केला नाही तर शरीराच्या अन्य अवयवांपर्यंत पसरायला देखील वेळ लागत नाही. यामुळे स्थिती अधिक गंभीर आणि जीवघेणी होते. कॅन्सर ज्या अवयवामध्ये असतो त्याच अवयवाच्या नावावरून त्याची ओळख होते. असे अनेक कारणं आहेत ज्यामुळे कॅन्सर सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. 

प्रोसेस्ड फूड (Processed food)

विविध प्रकारचे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ (Processed food) यांचे दीर्घकाळ सेवन केल्याने कोलन कॅन्सरचा (Cancer) धोका वाढू शकतो. हा आजार अनुवंशिकता, वाढते वय आणि खराब जीवनशैलीशी संबंधित आहे. नुकत्याच झालेल्या एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीची जीवनशैली दीर्घकाळ खराब राहिली तर तो या आजाराला बळी पडू शकतो.  

सोडा  (Soda drink)

सोडा ही शरीरीसाठी घातक असल्याचे अनेकजण सांगत असतात. सोडामध्ये आर्टिफिशियल साखर तसेच रंग आणि केमिकल याचे मिश्रम सोडामध्ये असते. परिणामी सोडाचे अतिसेवनमुळे कॅन्सरचा धोका अधिक असतो. 

दारूचे अति सेवन (alcohol)

अल्कोहोल (दारू) एक असे पेय आहे ज्यामध्ये कर्करोग (Cancer) निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या ग्रुप 1 मध्ये ठेवण्यात आले आहे. दारूमुळे 7 प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. जसे की, तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, यकृत (लिवर) कर्करोग, वॉइस बॉक्स कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग आणि महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग यांचा समावेश आहे.

वाचा: विराटपुढे सचिनही फिका? ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा

 

नॉन ऑर्गेनिक फळ  (Non organic fruit)

नॉन ऑर्गेनिक फळांमध्ये केमिकलचे प्रमाण अधिक असते. परिणामी कॅन्सरा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे. जर तुम्हाला कॅन्सर असले तर तुम्ही नॉन ऑर्गेनिक फळे खाऊ नका, तेच तुमच्यासाठी फायदेशीर असेल.

माइक्रोवेव मधील जेवण 

अनेकांना माइक्रोवेवमध्ये जेवण गरम करण्याची सवय असते. जर तुम्ही पॉपकॉर्न माइक्रोवेवमधून काढून खात असाल तर तुमच्यासाठी ते घातक ठरू शकते. यामुळे परफ्युओरुक्टेनोइक एसिड तयार होते. परिणामी कॅन्सर होण्याची लक्षणे अधिक आहेत. 

ही आहेत कॅन्सरची लक्षणे (symptoms of cancer)

कॅन्सर झाल्यानंतर वजन कमी होणी, ताप येणे, भूक न लागने, हाडांचे दुखणे, खोकला येणे, तोंडातून रक्त येणे अशी लक्षणे दिसून येतात. जर अशी लक्षणे दिसून येत असतील लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा...