नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) भारत बायोटेकची लस कोवॅक्सिनला इमरजेंसी यूस लिस्टिंगचा दर्जा मंजूर करण्याबाबत पुढील आठवड्यात अंतिम निर्णय घेईल. त्यामुळे आता Covaxinच्या जागतिक मंजूरीसाठी अजून आठवडाभर वाट पहावी लागणार आहे. त्यापूर्वी डब्ल्यूएचओची मंगळवारी काही शिफारशी देण्यासाठी तसंच इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली होती.
जागतिक आरोग्य संघटनेने ट्विट केलं आहे की, डब्ल्यूएचओ आणि तज्ज्ञांची स्वतंत्र टीम पुढील आठवड्यात जोखीम/फायद्याचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक घेईल. यानंतर कोवाक्सिनसाठी कोवॅक्सिनला इमरजेंसी यूस लिस्टिंगचा दर्जा मंजूर करायचा की नाही यावर अंतिम निर्णय घेईल.
जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय की, डब्ल्यूएचओ आणि त्याच्या स्वतंत्र तज्ज्ञांच्या तांत्रिक सल्लागार टीम इमरजेंसी यूस लिस्टिंगची प्रक्रिया ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही हे ठरवण्यासाठी आहे.
जानेवारी 2021 मध्ये, भारताने आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाचे कोविशील्ड आणि भारत बायोटेकचे कोवॅक्सिन मंजूर केलं. भारताशिवाय, आठ देशांनी कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे - गयाना, इराण, मॉरिशस, मेक्सिको, नेपाळ, पॅराग्वे, फिलिपिन्स, झिम्बाब्वे इत्यादी.