हार्ट फेल झालेल्या रूग्णाचं तब्बल वर्षभराने पुन्हा धडकलं हृदय!

भारतात पहिल्यांदाच रुग्णाच्या कमजोर हृदयाला आधार देण्यासाठी बसवलेलं कृत्रिम हृदय बाहेर काढण्यात आलं आहे.

Updated: Oct 6, 2021, 07:24 AM IST
हार्ट फेल झालेल्या रूग्णाचं तब्बल वर्षभराने पुन्हा धडकलं हृदय! title=

नवी दिल्ली : अनेकदा एखादा भयानक व्हिडीओ किंवा बातमी हृदयाचे आजार असलेल्या तसंच खूप भीती वाटणाऱ्या व्यक्तींनी पाहू नये असा मेसेज लिहिलेला असतो. मात्र आम्ही तुम्हाला सांगू की ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांनी ही बातमी जरूर वाचावी. 

भारतात पहिल्यांदाच रुग्णाच्या कमजोर हृदयाला आधार देण्यासाठी बसवलेलं कृत्रिम हृदय बाहेर काढण्यात आलं आहे. यानंतर काही वेळाने रुग्णाचं मूळ हृदय काम करू लागले आणि ते इतकं चांगलं काम करू लागलं की कृत्रिम हृदय काढून टाकण्यात आलं. आता 56 वर्षीय इराकी रुग्णाने आपल्या मुलाचे नाव डॉ. अजय कौल यांच्या नावावरून ठेवलं आहे. ज्या डॉक्टरांनी त्याला जीवन दिलं त्यांना तो देव मानतो त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे.

आर्टिफिशीयल हृदय काढलं बाहेर

नोएडाच्या फोर्टिस रूग्णालातील डॉक्टरांनी जवाद मोहम्मद यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली. दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेलं कृत्रिम हृदय बाहेर काढण्याचा आलं. हे केवळ क्वचित प्रसंगी घडतं की रुग्णाचं हार्ट फेल झाल्यानंतर तो इतका तंदुरुस्त होतो. 

डॉ.अजय कौल म्हणाले, "तीन वर्षांपूर्वी जवाद मोहम्मद हृदयविकाराच्या उपचारासाठी इराकमधून भारतात आले. त्याचं हार्ट फेल झालं होतं आणि हृदय स्वतःहून शरीराला रक्त पुरवू शकत नव्हतं. त्याला हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. परंतु कित्येक महिने प्रतीक्षा यादीत राहूनही दाता सापडला नाही. जुलै 2018 मध्ये डॉक्टरांनी त्याला कृत्रिम हृदय (LVAD) बसवण्यात आलं." 

लेफ्ट वेंट्रिकुलर असिस्टेड डिव्हाइस (LVAD)चा वापर अशा लोकांमध्ये केला जातो ज्यांचं हृदय खूप कमकुवत झाले आहे आणि रक्त पंप करण्याची क्षमता नाही.

जेव्हा तो एका वर्षानंतर 2019 मध्ये पुन्हा फॉलो अपसाठी आला, तेव्हा डॉक्टरांनी पाहिलं की रुग्णाचं स्वतःचं हृदय कार्यरत आहे. त्यानंतर काही कृत्रिम हृदयाचं काळ पॉवर सप्लाय बंद करून डॉक्टरांनी तपासणी केली. हृदय, बाहेर असलेल्या बॅटरीशी जोडलेलं होतं ज्याला दररोज चार्ज करणं आवश्यक होतं. ही तपासणी 2 वर्षे केली गेली. या दोन वर्षांत रुग्णाचं हृदय अधिक चांगलं काम करू लागले.  

आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 130 उपकरणं बसवण्यात आली आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत मशीन बाहेर काढण्यात आलं नाही कारण हृदयाचं फिटनेस पूर्णपणे पुर्ववत झाल्याचं डॉक्टरांना दिसलं नव्हतं. बऱ्याच प्रकरणांमध्ये, डिव्हाइस बसवल्यानंतर हृदयाची क्षमता परत येते. कारण आधार मिळाल्याने हृदयावरील दबाव कमी होतो. 

कृत्रिम हृदयाची किंमत भारतात 70 लाख ते 90 लाख रुपये आहे. हे प्रामुख्याने अबॉट आणि मेडट्रॉनिक्स या दोन कंपन्यांनी बनवलं आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया मोहिमेनंतर अनेक वैद्यकीय उपकरणं भारतात बनू लागली आहेत.