Health News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी

Health News :  सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय? 

Updated: Dec 12, 2022, 12:52 PM IST
Health News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी  title=
Who reveales Antibiotics Medicine Name Which are Not Working In Bacterial Infection latest Marathi news

Health Update : हवामानातील बदल किंवा एखाद्या आजाराची साथ आल्यास सहसा सर्दी- ताप, खोकला असा त्रास अनेकांनाच होतो. अशा वेळी सहसा डॉक्टरकडे जाण्यापूर्वी प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे घरातच असणाऱ्या एखादं औषध घेण्याला. सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय? जागतिक आरोग्य संघटनेनं  (World Health Organization) तुमच्या या प्रश्नांची उत्तरं देत अत्यंत महत्त्वाचा अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये ही औषधं बॅक्टेरियल इंन्फेक्शनवर फारशी प्रभावी ठरत नसून, उलटपक्षी रक्तात इतर संसर्ग वाढवत आहे. (Who reveales Antibiotics Medicine Name Which are Not Working In Bacterial Infection latest Marathi news)

बॅक्टेरियल इंन्फेक्शनची लक्षणं

सहसा या संसर्गाची लक्षणं अतिशय सर्वसामान्य असतात. यामध्ये न्यूमोनिया, युरिनरी ट्रॅक्ट इंन्फेक्शन, टीबी यांचा समावेश आहे. तर, सर्दी- पडसं, ताप, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा, श्वास घेण्यात अडचणी अशी लक्षणं दिसतात. अशा तक्रारी सांगितल्यास डॉक्टर काही अँटीबायोटीक्स देतात. पण, नव्या निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार ही औषधं या आजारांवर प्रभावी ठरत नाहीत. वैद्यकीय भाषेमध्ये या प्रकाराला अँटीमाइक्रोबियल रेजिस्टेंस असं म्हणतात. 

कोणकोणती औषधं निकामी? 

न्यूमोनिया झाल्यास अशा परिस्थितीत कार्बापेनेम्स (Carbapenems) उपायकारी मानलं जात होतं. पण, या आजारासंदर्भातील 8 टक्के संसर्ग या औषधांनीही बरा होत नाहीये.  नेशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसिनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यामध्ये मेरोपेनेम, बायपेनेम, एर्टापेनेम, इमिपेनेम, पानीपेनेम, डोरिपेनेम या औषधांचा समावेश आहे. 

हेसुद्धा वाचा : Socks Infection : थंडीत मोजे घालून झोपताय! तुम्हाला 'या' गोष्टींचा धोका

सर्वसामान्य लैंगिक संसर्गामध्ये सिप्रोफ्लोक्सिन (Ciproflaxacin) हे औषध दिलं जातं. पण, साधारण 60 टक्के प्रकरणांमध्ये हे औषध फारसं प्रभाव करताना दिसत नाहीये ही चिंतेची बाब. 

यूरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शन अतिशय सर्वसामान्य आहे. यामध्ये फर्स्ट लाइन ड्रग अर्थात प्रथमोपचार म्हणून एम्पीसिलीन आणि को-ट्राइमोक्साजोल (ampicillin and co-trimoxazole) अशी औषधं देण्यात येतात. त्यामागोमागच फ्लोर क्विनोलोन्स (fluoroquinolones) हे औषध दिलं जातं. पण, आता मात्र 20 टक्के रुग्णांवर या औषधाचा परिणाम होताना दिसत नाहीये. त्यामुळं आता या औषधांना पर्यायी औषध बाजारात आणण्यासाठी वैद्यकिय क्षेत्र सक्रीय दिसत आहे.