Socks Infection : थंडीत मोजे घालून झोपताय! तुम्हाला 'या' गोष्टींचा धोका

Socks Infection : रात्री झोपताना मोजे (Socks Infection) घातल्याने शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा (blockage in blood flow) निर्माण होतो. रक्तप्रवाहात अडथळा शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मोजे काढून टाकावेत.

Updated: Dec 11, 2022, 09:27 PM IST
Socks Infection : थंडीत मोजे घालून झोपताय! तुम्हाला 'या' गोष्टींचा धोका  title=

Socks Infection: हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्घतीचा अवलंब करत असतात. काही लोक स्वेटर घालून, तर काही लोक रात्री मोजे (Socks Infection) घालून देखील झोपतात.मात्र अशाप्रकारे मोजे (Socks Infection)  घालून झोपणे त्यांना महागात पडू शकते. कारण या सवयीमुळे तुम्हाला अनेक आजारांचा धोका आहे. नेमक्या कोणत्या आजाराचा धोका आहे, हे जाणून घेऊयात. 

ब्लड सर्क्युलेशन बिघडतं

रात्री झोपताना मोजे (Socks Infection) घातल्याने शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा (blockage in blood flow) निर्माण होतो. रक्तप्रवाहात अडथळा शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मोजे काढून टाकावेत.

चिंता किंवा अस्वस्थता वाटते

जर तुम्ही रात्री झोपताना मोजे घालत असाल तर तुमच्या शरीराचे तापमान कधीही वाढू शकते. तापमानात वाढ झाल्यामुळे अचानक अस्वस्थता वाटते.तसेच रात्री घाम येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे रात्री मोजे घालणे टाळावे. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल तर ते रात्री मोजे घालण्यामुळे असू शकते.

स्किन इंफेक्शन 

आपल्या सॉक्समध्ये अनेक बॅक्टेरिया असू शकतात. दिवसभर बाहेर राहिल्यामुळे हे बॅक्टेरिया आपल्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. या स्किन इन्फेक्शनपासून (Skin infection) सुरुवात होऊन मोठी समस्याही उद्भवू शकते.

हृदयाच्या आजाराचा धोका

रात्री मोजे अनेकदा आपल्या पायात घट्ट असतात. त्यामुळे पायांच्या नसांवर दाब पडतो आणि रक्त उपसताना अडथळा निर्माण होतो. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार होण्याचा धोकाही असतो.

(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे देण्यात आली आहे. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)