Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट

Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?  

नेहा चौधरी | Updated: Sep 19, 2023, 08:05 AM IST
Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट title=
What is the best time to drink milk for Health Benefits

Best Time To Drink Milk : दूध हे आरोग्यासाठी उत्तम असतं हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत म्हणजे प्रत्येक वयात दूध पिणं आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. दूधातून आपल्याला प्रोटीन मिळतं हे माहिती पण त्याशिवाय त्यातून कॅल्शियम, थाइमिन, निकोटिनिक एसिड आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक शरीराला मिळतं असतात. (What is the best time to drink milk for Health Benefits)

घरोघरी सकाळी उठल्यावर लहान मुलांना दूध दिलं जातं. त्यानंतर अनेकांना रात्री झोपताना एक ग्लास दूध पिऊन झोपण्याची सवय असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, आरोग्याला दुप्पट फायदा मिळवण्यासाठी दूध सेवन करण्याची एक वेळ आहे. म्हणजे नेमकं दूध सकाळी की रात्री कधी प्यायल्याने तुम्हाला फायदा होता. तर आज आम्ही त्याबद्दल सांगणार आहोत. 

दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री?

हेल्थ एक्सपर्टनुसार तुमचं वय आणि शारीरिक ठेवण यावर दूध पिण्याची योग्य वेळ ठरवली पाहिजे. दूध हे पचनास जड असल्याने वयानुसार त्याच सेवन करावं, असं तज्ज्ञ सांगतात. लहान मुलांचा विचार केल्यास त्यांना सकाळीच्या वेळेत दूध देणं सर्वात उत्तम असतं. खरं तर लहान मुलांसाठी दूध कधीही घेता येतं. लहान मुलांच्या पोषणासाठी दूध खूप गरजेच असतं. 

हेसुद्धा वाचा - Trending News : पाणी बसून आणि दूध उभं राहून प्यायला हवं, कारण जाणून व्हाल अवाक्

आता ज्या लोकांची वय जास्त आहे शिवाय ज्यांची पचनशक्ती कमकुवत असेल त्यांनी सकाळी दूध प्यायला नको. या लोकांनी दूधात थोडं पाणी टाकून प्यावं. 

ज्येष्ठ नागरिकांनी संध्याकाळी दूधाचं सेवन करणं योग्य आहे. शिवाय त्यांनी गायीचं दूध प्यावं कारण ते पचनासाठी हलकं असतं. 

तर आयुर्वेदात रात्री गरम दूध सेवन करण्यास सांगतात. ज्या व्यक्तींना रात्री झोप येत नाही त्यांनी गरम दूध प्यायला पाहिजे. 

ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे त्यांना रात्री दूध पचवणे जड जातं. त्यांनी सकाळी उठल्यावर थंड दूध घेतलं पाहिजे. 

जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूधचं सेवन करु नयेत. कारण सकाळी उठल्यावर तुमची शूगर वाढेल.  

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)