Bone Health: हाडांतील कॅल्शिअम आणि प्रथिने हळूहळू शोषली गेली की हाडे पोकळ व कमकुवत होतात. जीवनसत्व ड आणि कॅल्शियम मिळवण्याचा उत्तम स्त्रोत दूध आहे. त्यामुळं आहारात दूध, दही, ताक, चीज, पनीर याचा समावेश आवर्जुन करावा, असं सांगितलं जातं. पण त्याचबरोबर या चार पदार्थांचाही आहारात समावेश केल्यास हाड ठिसूण व कमजोर होतात. आजची बदलती जीवनशैलीमुळं वृद्धांबरोबरच तरुणांनादेखील अनेक आजारांचा सामना करावा लागतो. शरीर निरोगी राहण्यासाठी आत्तापासून लक्ष देणे गरजेचे आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व हाडे मजबूत ठेवण्यासाठी काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कोणते आहेत हे पदार्थ जाणून घ्या.
आरोग्य तज्ज्ञांच्यामते कॅफेनहे शरीरासाठी घातक असते. कॅफेन हे चहा,कॉफीमध्ये जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळं चहा-कॉफीचे अतिसेवनही हाडांचा हानिकारक ठरते. कॅफेनमुळं हाडं ठिसूळ होऊ शकतात. चहा कॉफी व्यतिरिक्त कॉल्ड्रिंक्समध्येही कॅफेन असते. एनर्जी ड्रिंक्स, सोडा, चहा यासारखे पदार्थ हाडे ठिसूळ करु शकतात. कॅफेनचे सेवन अतिप्रमाणात केल्यामुळं शरीर कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळं शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते आणि त्याचा परिणाम हाडांवर होतो. कॅफेनमुळं हाडांना बळकटीदेणाऱ्या व्हिटॅमिन डीच्या लेव्हलवर चुकीचा परिणाम होतो.
व्हीट ब्रान म्हणजेच गव्हाचा कोंडा अतिप्रमाणात खाल्ल्यानेही हाडे ठिसूळ होतात. यात हाय लेव्हलचे फायटेट असते. त्यामुळं कॅल्शियमवर त्याचा चुकीचा परिणाम होतो. अनेकजण गव्हाच्या कोंड्याचे सेवन करतात कारण त्यात डाएट्री फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. वीट ब्रॅनच्या ऐवजी तुम्ही ओट्स ब्रॅनचा वापर करु शकता कारण यात फायटेट प्रमाण कमी असते. फायटेट हे प्रकारचे अँटी-न्युट्रीएंट असते. साधारणपणे झाडांमध्ये ते आढळले जाते.
मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या अधिक तीव्र होते. त्याचबरोबर अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने हाडांवरही त्याचा वाईट परिणाम होतो. अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने हाडातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सोडियमचे अतिप्रमाणात सेवन केल्यास ऑस्टियोपोरोसिसचा धोका अधिक वाढतो.
लिव्हरसाठी मद्यपान करणे धोकादायक मानले जाते. अतिप्रमाणात दारू पिणे हे शरीरासाठीही नुकसानदायक आहे. शरीरातील इतर अवयवांवरही त्याचा परिणाम होतो. कॅल्शियम, व्हिटॅमिन-डी आणि मॅग्निशियम हे हाडांसाठी महत्त्वाचे मानले जातात. मात्र हे पोषकतत्वे दारुमुळं शरीराला मिळत नाहीत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळं हाडांची रिमॉडलिंग सायकलची गती मंदावते आणि हार्मोन्स लेव्हलवरही त्याचा परिणाम होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)