भात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...

Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...

श्वेता चव्हाण | Updated: May 19, 2023, 10:40 AM IST
भात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...  title=
Weight loss tips

How To Eat Rice For Weight Loss: खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपण निरोगी राहावे असे प्रत्येकाला वाटते, पण तसे होत नाही. अशावेळी वजन वाढण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. बरेच लोक जिममध्ये जातात, घाम गाळतात आणि वजन कमी करतात. त्यासाठी डाएट ही करतात. तसेच अनेकजण सोशल मीडियावर वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम शोधत असतात. ज्यामध्ये तुम्हाला वर्कआऊट आणि योगाद्वारे तुमचे वजन कसे कमी करता येईल हे सांगितले आहे. पण तुम्हाला माहितीय का? तुमच्या रोजच्या जेवणातील ताटामधील भात ही तुमचे वजन कमी करु शकते. यासाठी कोणते उपाय केले पाहिजे ते जाणून घ्या...

पोटाची चरबी कमी करण्यासाठी पांढरा तांदूळ हा निरोगी आहाराच्या यादीबाहेर आहे. कारण त्यात कॅलरीज जास्त असतात. जे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. मात्र बर्‍याच अभ्यासांमध्ये असे नोंदवले गेले आहे की, भात योग्य प्रकारे खाल्ल्याने चयापचय वाढण्यास आणि पौष्टिक घटक वाढण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी पांढरा तांदूळ कसा वापरता येईल? वजन कमी करायचे असेल तर भात खातांना काही गोष्टी लक्षात ठेवा. 

भात खाऊन वजन कमी करा

वजन कमी करण्याचा पहिला नियम म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारातील कॅलरीजची संख्या कमी करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही दिवसभरात जितक्या कॅलरीज घेतात त्यापेक्षा अधिक तुम्हाला बर्न कराव्या लागतील. म्हणूनच वजन कमी करण्याच्या आहारांमध्ये नेहमीच कॅलरीचे प्रमाण कमी असते. पण तुम्हाला भात पूर्णपणे वगळण्याची गरज नाही.  

वाचा: स्वयंपाकघरातील भांडी, मिक्सर, गॅस, फ्रिज कुठे असावीत? पाहा वास्तुशास्त्राचे नियम

वजन कमी करण्यासाठी भात कसा खावा?

भात खाऊन वजन कमी करायचं असेल, तर भात कधी आणि किती खातो या गोष्टींकडे लक्ष द्या. वजन कमी करण्यासाठी तुम्ही एकावेळी एक कप भात खाल्ला पाहिजे. असे केल्याने कॅलरीजचे प्रमाण कमी होतील. तसेच भातामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. या कारणास्तव, आपल्या खाण्याच्या दुसऱ्या पदार्थांमधून कार्बोहायड्रेटचे सेवन करु नका. 

तसेच भात बनवण्यासाठी तेल किंवा कोणत्याही प्रकारचे तेल वापरू नका. असे केल्याने कॅलरीज वाढतात. हिरव्या भाज्या वापरा. तांदळाची पौष्टिकता वाढवण्यासाठी तुम्ही हिरव्या भाज्या वापरू शकता. म्हणूनच तुम्ही वेगवेगळ्या डाळी आणि आमटीसोबत भात खाऊ शकता. तुम्ही अंडी आणि चिकनसोबत भातही खाऊ शकता.

तांदूळ तयार करण्याची पद्धत बदलली. तांदूळातून जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स काढून टाकण्याचा मार्ग म्हणजे तो निरोगी पद्धतीने शिजवणे. आपण काही तासांसाठी तांदूळ भिजवू शकता, उकळू शकता.

पांढरा तांदूळ हा ग्लूटेनमुक्त आहार आहे. ज्यामध्ये चरबी कमी असते आणि ते सहज पचतात. त्यामुळे चयापचय वाढते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तांदळात जीवनसत्त्वे, खनिजे, जीवनसत्व ब, मॅग्नेशियम आणि इतर पौष्टिक घटक असतात. मात्र पांढरा भात जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते. जर तुम्ही भात खाताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे वजन कमी होऊ शकते.