Weight Loss : हिवाळ्यात वजन कमी करायचंय? 7 दिवस 7 स्पेशल ड्रिंक्स आणि व्हा स्लिम ट्रिम

Weight Loss Drink : वाढलेलं वजन कमी करणं हे सर्वात कठीण काम असतं. जर तुम्हाला हिवाळ्यात वजन कमी करायचं असेल तर 7 दिवस 7 स्पेशल ड्रिंक्सचं सेवन करा आणि स्लिम ट्रीम व्हा. 

नेहा चौधरी | Updated: Nov 22, 2023, 07:08 AM IST
Weight Loss : हिवाळ्यात वजन कमी करायचंय? 7 दिवस 7 स्पेशल ड्रिंक्स आणि व्हा स्लिम ट्रिम title=
Want to lose weight in winter 7 Days 7 Special Drinks and Be Slim Trim Weight Loss Drink at home

Weight Loss Drink : आजकाल प्रत्येक जण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाला आहे. त्यासाठी तो व्यायाम आणि डाएटवर विशेष लक्ष देतो. पण बदलेली जीवनशैली, खाण्याच्या वेळा आणि अपुरी झोप यामुळेही वजन झपाट्याने वाढतं. अशावेळी हे वाढलेले वजन कमी कसं करायचं याची चिंता तुम्हाला सतवत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी आज ड्रिंक्स घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला डाएटिंग आणि जीम कमी करुनही वजन कमी करण्यात यश मिळतं नसेल. तर 7 दिवस 7 स्पेशल ड्रिंक्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. (Want to lose weight in winter 7 Days 7 Special Drinks and Be Slim Trim Weight Loss Drink at home)

पहिल्या दिवस - सोमवार - मीठ पुदिन्याचं पाणी

यासाठी तुम्ही ताजी काकडी धुवून सालासह त्याचे छोटे तुकडे करा. त्यात ताजी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून टाका. आता यात एक ग्लास पाणी टाकून मिक्सरमधून याचा रस  तयार करा. आता या पेयामध्ये तुम्ही चिमूटभर काळं मीठ टाकून उपाश्यापोटी याचं सेवन करा. 

याचा फायदा कसा होता?

फायबरयुक्त काकडीचं सेवन केल्यामुळे पोट दिवसभर भरल्यासारखं वाटतं. तर पुदिन्यात भूक नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे या ड्रिंक्सच्या मदतीने तुम्ही वजन कमी करु शकता. काळ्या मीठाने वजन कमी होतं. 

दुसरा दिवस - मंगळवार - लिंबू पाणी 

वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी लिंबू पाणी हे सर्वात बेस्ट पेय आहे. लिंबूमधील व्हिटॅमिन सी आणि पेक्टिन फायबर  तुमची चरबी वेगाने कमी करण्यासाठी मदत करते. त्याशिवाय शरीरातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत मिळते. 

तिसरा दिवस - बुधवार - बीटरुट आणि अप्पल सायडर व्हिनेगरचे पेय

यासाठी 3 कप पाणी, पुदिन्याची पानं, 2 चमचे अप्पल सायडर व्हिनेगर, 1/2 लिंबाचा रस, 1/2 बीटरुट यांचं पेय तयार करा. त्यानंतर हे पेय गाळून त्याचं सेवन करा. 

चौथा दिवस - गुरुवार - पुदिन्याचा चहा 

एक ग्लास पाण्यात पुदिन्याची ताजी पानं उकळा. आता या एका ग्लासमध्ये अर्धा चमचा मध घालून हे पेय घ्या. हे पेय वजन कमी करणे, बीएमआय, शरीरातील चरबीची कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 

पाचवा दिवस - शुक्रवार - हळदीचं दूध

हळदीमध्ये पॉलीफेनॉल आणि कर्क्यूमिन आहे. त्याशिवाय अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इंफ्लेमेटरी घटक असल्याने शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते. हळद वजन कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे.

सहाव्या दिवशी - शनिवार - मेथीचं पाणी

यासाठी रात्रभर दोन चमचे मेथीचं दाणे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून त्याचं सेवन करा. मेथीमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे याच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास नक्कीच फायदा होतो. 

सातवा दिवस - रविवार - बार्लीचं पाणी

बार्लीच्या पाण्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. जे चयापचय वाढवून तुमचं वजन जलद गतीने करण्यास मदत करतं. या पेयाच्या सेवनाने तुम्हाला भूक लागत नाही. महिन्याभर तुम्ही या वेगवेगळ्या पेयाचं सेवन केल्यास तुम्हाला जबरदस्त फायदे दिसून येतील. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)