Chikungunya Vaccine जगाला मिळाली पहिली व्हॅक्सीन, अमेरिकेच्या FDA कडून मंजुरी

Vaccine of chikungunya: चिकनगुनियाची पहिली लस सापडली असून अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने काही नियम लक्षात घेऊन तिच्या वापरास मान्यता दिली आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 13, 2023, 11:40 AM IST
Chikungunya Vaccine जगाला मिळाली पहिली व्हॅक्सीन, अमेरिकेच्या FDA कडून मंजुरी  title=

डासांमुळे अनेक आजार होतात. ज्यामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. यापैकी एक आजार म्हणजे चिकनगुनिया हा आजार, मात्र आता त्याची लस तयार करण्यात आली आहे. IXCHIQ असे या नवीन लसीचे नाव आहे. चिकुनगुनिया हा देखील डासांमुळे होणारा आजार आहे. ज्यामुळे खूप ताप येतो तसेच शरीराच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. हा रोग विशेषतः लहान मुले आणि नवजात बालकांसाठी अत्यंत घातक मानला जातो. चिकुनगुनियावर कोणताही विशिष्ट उपचार नसून त्यादरम्यान उद्भवणाऱ्या लक्षणांनुसार औषधे देऊन उपचार केले जातात. मात्र आता त्याची लस उपलब्ध झाल्याने या डासांमुळे पसरणाऱ्या आजाराचा प्रसार बऱ्याच अंशी थांबू शकतो.

एफडीएनेही मान्यता दिली

यूएस अन्न आणि औषध प्रशासनाने IXCHIQ ला मान्यता दिली आहे. या लसीचा वापर केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी मंजूर करण्यात आला आहे. ज्या लोकांना चिकुनगुनियाची लागण होण्याचा धोका जास्त असतो त्यांना ही लस घेण्याचा सल्ला दिला जातो. चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही लस महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

यावर्षी आढळले चिकुनगुनियाचे रुग्ण 

जर आपण वर्ष 2023 बद्दल बोललो तर, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी चिकनगुनियाचे 4 लाखांहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत आणि सुमारे 350 मृत्यू देखील नोंदवले गेले आहेत. ही नवीन लस दरवर्षी वेगाने वाढत असलेल्या या केसेस रोखण्यास मदत करू शकते.

चिकनगुनियाची लक्षणे

हा देखील एक प्रकारचा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. जो चिकुनगुनिया विषाणू किंवा CHIKV नावाच्या विषाणूमुळे होतो. ताप आणि सांधेदुखी व्यतिरिक्त, चिकुनगुनियामुळे इतर अनेक लक्षणे देखील दिसू शकतात, जसे की त्वचेवर पुरळ उठणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे  जर एखाद्या व्यक्तीला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्याने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)