'या' लोकांनी काजू खाणं टाळावं अन्यथा, आरोग्यावर होईल वाईट परिणाम

Cashew Side Effects : दिवाळीत अनेक घरामध्ये सुवा मेवा मोठ्या प्रमाणात आले आहेत. दिवाळीत सुवा मेवाचे डब्बे गिफ्ट दिले जातात. त्यातील काजू हे काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक असतात. 

नेहा चौधरी | Updated: Nov 13, 2023, 01:00 PM IST
'या' लोकांनी काजू खाणं टाळावं अन्यथा, आरोग्यावर होईल वाईट परिणाम  title=
These people should avoid eating cashew otherwise it will have bad effects on health

Cashew Side Effects :  दिवाळी घरोघरी फराळ केला गेला आहे. फराळामध्ये मोठ्या प्रमाणात सुका मेवाचा वापर करण्यात येतो. शिवाय दिवाळी गिफ्ट म्हणून सुका मेव्याचा डब्बा देण्यात येतो. हिवाळ्यात सुका मेवा खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. बदाम, मनुका, पिस्ता आणि काजू हे सर्वात आवडणारा सुका मेवा आहे. काजूमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, जस्त, लोह, मँगनीज आणि सेलेनियम सारखी खनिजे आढळतात आणि व्हिटॅमिन ई देखील त्यात भरपूर असतं. हिवाळ्यात दररोज काजू खाणे आरोग्यासाठी चांगलं असतं, परंतु काही आरोग्य समस्यांमध्ये काजूचे सेवन टाळावं. कारण त्यामुळे  तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. (These people should avoid eating cashew otherwise it will have bad effects on health)

पोटाच्या समस्यांमध्ये

जास्त प्रमाणात काजू खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर काजूचे सेवन करू नका.

वजन वाढू शकते

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर काजू खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते आणि त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. काजूमध्ये कॅलरीज जास्त असतात. यामुळे वजन वाढू शकते.

ऍलर्जी असू शकते

अनेकांना काजूची ऍलर्जी असते. काजू खाल्ल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो, पुरळ उठणे, खाज येणे, उलट्या होणे किंवा जुलाब होत असल्यास त्यांचे सेवन ताबडतोब बंद करा.

डोकेदुखी

काजूमुळे डोकेदुखी होऊ शकते. काजूमध्ये असलेले अमिनो अॅसिड टायरामाइन आणि फेनिलेथिलामाइनमुळे डोकेदुखी होऊ शकते. डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होत असल्यास काजूचे सेवन करू नका.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)