Eye Care: आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयव म्हणजे आपले डोळे. आपल्या डोळ्यात धुळीचा एक कण जरी गेला तरीही आपल्या डोळ्यात पाणी येतं. आपल्या डोळ्यांच्या नैसर्गिक सुरक्षेसाठी डोळ्यावर पापण्या देखील असतात. आपण डोळ्यांनी केवळ समोरच पाहत नाहीत तर आजूबाजूला, डोळ्यांच्या कोपऱ्यातून देखील पाहतो (Corner Eye Problem) . अशात आज या बातमीत आम्ही तुम्हाला डोळ्यांच्या एका अशा आजाराबाबत सांगणार आहोत ज्याबाबत तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल. या बातमीत आम्ही तुम्हाला टनेल व्हिजनबाबत ( Tunnel Vision ) सांगणार आहोत.
सध्या आपल्याला जो तो व्यायाम करायला हवा, वजन कमी करायला हवं, हृदयाची काळजी घ्यायला हवी याबाबत सल्ला देत असतो. मात्र, आपल्याला क्वचितच असं कुणी भेटेल जो आपल्याला डोळ्यांची काळजी घयायला सांगत असेल. सध्याच्या डिजिटल जगात डोळ्यांची काळजी घेणं अनिवार्य झालं आहे. लहानपणीच मुलांच्या डोळ्यांवर चष्मा लागलेला आपण पाहतो. प्रत्येक तिसऱ्या किंवा चौथ्या माणसाला डोळ्यांचा आजार झालेला पाहतो. अनेकदा हे अणुवंशिक असतं. मात्र सध्याच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे तुमचे डोळे कमजोर होऊ शकतात. यानेच तुम्हाला टनेल व्हिजनचा आजारही होऊ शकतो. (Tunnel Vision)
हा आजार आपल्यापैकी कुणालाही होऊ शकतो. म्हणूनच या आजारबत जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या आजाराची लक्षणं आणि यावरील इलाजांबाबत
टनेल व्हिजनमध्ये तुमच्या डोळ्यांची कडेची दृष्टी खराब होत जाते. यामुळे तुम्हाला समोरच्या गोष्टीही नीट दिसत नाहीत. या त्रासामुळे तुमची केवळ सेंट्रल व्हिजन काम करत असल्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टी एका टनेलमध्ये असल्याचं भासतं.
जर कुणाला ही टनेल व्हिजन आहे असं वाटत असेल तर तुम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.