या '३' रंगाचे पदार्थ आरोग्यास फायदेशीर!

आरोग्य उत्तम राहण्यासाठी गरजेचे असते ते म्हणजे अन्न.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 27, 2018, 12:53 PM IST
या '३' रंगाचे पदार्थ आरोग्यास फायदेशीर! title=

नवी दिल्ली : आरोग्य उत्तम राहण्यासाठी गरजेचे असते ते म्हणजे अन्न. संतुलित, सात्विक अन्न घेतल्याने आरोग्यास नक्कीच फायदा होतो. प्रोटीन, फायबर, कॅल्शियम यांसारखे पोषकघटक आरोग्यास फायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे काही विशिष्ट रंगाचे पदार्थ शरीराबरोबर मनाचे आरोग्य राखण्यासही मदत करतात. तर जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ...

केशरी रंग

केशरी म्हणजे नारंगी रंग. नारंगी रंगाच्या भाज्या व फळे खाल्याने मेंदू तरतरीत राहतो. नारंगी रंग म्हणतात आपल्या समोर येणारे फळ म्हणजे संत्र. संत्र्यात असलेल्या व्हिटॉमिन डी मुळे शरीरातील अन्य भागात रक्तसंचय उत्तम प्रकारे होतो. व्हिटॉमिन डी च्या कमतरतेमुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. दररोज एक संत्र खाल्यास रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसंच मधुमेहींसाठी देखील संत्र अत्यंत फायदेशीर आहे.

सफेद रंग 

मशरूम, अंडे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. यात कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन, आर्यन भरपूर प्रमाणात असल्यानो शरीर हेल्दी ठेवण्यासीठी खूप मदत होते. तसंच रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.

हिरवा रंग

हिरव्या भाज्यात आणि फळांमध्ये लूटीन व इंडोल नावाचे फायटोकेमिकल्स असतात. जे पोटासाठी अत्यंत उत्तम असतात. पालक, मेथी या भाज्यांमध्ये फायबर, आर्यन भरपूर प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.