Benefits of Curd : प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून हा क्षण आला असेल. परीक्षेला जाण्यापूर्वी आईने दही आणि साखर खायला घातलं असेल. त्यानंतर मोठेपणी नोकरीसाठी मुलाखत देण्यापूर्वीही आईने परत तुम्हाला दही आणि साखर खाऊ घातलं असेल. मग लग्नासारख्या शुभ प्रसंगी आई दही साखर द्यायला कशी विसरणार. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की असं करण्यामागे काय कारण आहे. शास्त्रानुसार कुठलंही शुभ कार्य करण्यापूर्वी दही आणि सारखं खाणे हे शुभ मानलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे यामागे वैज्ञानिक कारणही आहे ते. आज आपण शास्त्र आणि विज्ञान काय सांगतं जे जाणून घेऊयात.
हिंदू धर्मात दहीला विशेष महत्त्व आहे. पूजेच्या वेळी दही असणं आवश्यक आहे. कारण धर्मातील पाच अमृतांपैकी एक हे दही आहे, असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की, पांढरा रंग हा चंद्राचा कारक आहे. तर चंद्र मनाचा कारक आहे. त्यामुळे जर तुम्ही चांगल्या कामासाठी बाहेर पडतं असाल आणि पांढऱ्या रंगाचा पदार्थ खाल्ल्यासह तुमचं मन एकाग्र होतं. शिवाय मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. (trending news eating curd or dahi sugar before leaving house doing important work its good Is there a scientific reason marathi news)
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला जीवनातील सुख आणि शांती कारक मानलं जातं. शुक्राचा आवडता रंगही पांढरा आहे. त्यामुळे शुक्र आणि दह्याचा घनिष्ट संबंध आहे. शास्त्रानुसार दही खाल्ल्याने राशीतील शुक्राची स्थिती मजबूत होते. त्यामुळे जीवनात समृद्धीची शक्यता वाढते. त्यामुळे घरातून बाहेर पडताना दही-साखर खाण्याची प्रथा आहे.
हे आपल्या सर्वांना माहित आहे की, दही आपल्या शरीरासाठी एक सुपरफूड आहे. दही हे अन्न पचनास मदत करतं.कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, बी-12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजेही दुधापासून बनवलेल्या दह्यात आढळतात. पण साखर आरोग्यदायी मानली जात नाही. मग दही आणि साखर खा असं का म्हणतात. मी तुम्हाला सांगतो की दही-साखर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि आयुर्वेदात याचा पुरावा आहे.
आपण एखाद्या चांगल्या कामासाठी बाहेर पडतो तेव्हा आपण तणावात असतो. अशावेळी दही जे थंड असते ते जेव्हा आपण खातो त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. आपलं मन शांत होतं, ज्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. तर साखर हा ग्लुकोजचा महत्त्वाचा स्त्रोत मानला जातो. जेव्हा आपण या दोन गोष्टी एकत्र खातो तेव्हा ते आपले शरीर थंड ठेवते आणि आपल्याला संपूर्ण दिवसासाठी त्वरित ऊर्जा देते. अशा परिस्थितीत परीक्षा हॉलमध्ये परीक्षा देणारे मूलं असो किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणारी व्यक्ती असो, अशा परिस्थितीत दही-साखर खाल्ल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळते.
1. हिवाळ्यात आपली पचनशक्ती कमजोर होते. अशावेळी दही खाल्ल्यामुळे अन्नपदार्थ पचनास मदत होते. शिवाय शरीरातील पीएच संतुलन व्यवस्थापित करते, जे ऍसिड तयार होण्यास प्रतिबंध करते. दही आम्लपित्त रोखून पचनास खूप मदत करतं.
2. दही खाल्ल्यामुळे निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी फायदा होतो. त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी दही खाल्ल्यामुळे त्वचा मॉइश्चरायझिंग होते.
3. दह्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि प्रथिने असतात. लॅक्टोबॅसिलसची उपस्थिती धोकादायक जीवाणू आणि संक्रमणांना शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करतं.