स्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने मिळवा चमकदार त्वचा!

ऊन, धुळ, प्रदुषण याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.

Updated: Jun 13, 2018, 07:58 AM IST
स्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने मिळवा चमकदार त्वचा! title=

मुंबई : ऊन, धुळ, प्रदुषण याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. सनटॅनमुळे चेहरा निस्तेज होतो आणि त्यावर सुरकुत्या येऊ लागतात. यावर उपाय म्हणून आपण महागडे प्रॉड्क्टस वापरतो. पण त्यातील केमिकल्स त्वचेचे नुकसान करतात. पण टॉमेटोने त्वचेची गेलेली चमक, तेज परत मिळवता येईल. पण कसे? जाणून घेऊया...

पोर्स बंद करण्यासाठी

टॉमेटोमधील गुणधर्म त्वचेसाठी वरदान ठरतात. टॉमेटो एक उत्तम क्लिंजर आहे. टॉमेटोमुळे ओपन झालेले पोर्स कमी करण्यास मदत होते. पोर्स मोठे झाल्याने त्यात घाम जमा होते. या शिवाय वय अधिक भासते. म्हणून चेहऱ्यावरील पोर्स बंद करण्यासाठी टॉमेटोच्या रसात लिंबाचा रस मिसळा आणि कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा. असे नियमित केल्याने पोर्स कमी होऊ लागतील.

उजळपणा

चेहरा उजळ होण्यासाठी टॉमेटोमध्ये काकडी, पपई मिसळून लावा. त्यामुळे त्वचा उजळेल. हा उपाय ऑयली त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. 

ब्लॅकहेड्स

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी चेहऱ्यावर टॉमेटो लावा. असे केल्याने ब्लॅकहेड्स दूर होऊन चेहरा स्वच्छ आणि चमकदार होईल. तेलकट त्वचा असल्यास टॉमेटोसोबत काकडीचा रस एकत्र करुन कापसाच्या बोळ्याने चेहऱ्याला लावा. नियमित हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होईल.

सनटॅन

सनटॅन दूर करण्यासाठी लिंबू आणि टॉमेटाच्या रसात थोडेसे ओटमील आणि चमचाभर दही घाला. एकत्र मिसळून पॅक बनवा. या पॅकमुळे सनटॅन दूर होईल आणि त्वचा सैल पडण्याचा त्रास कमी होईल.