मुंबई : त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. पण ऋतू, हवामानानुसार त्वचेतही बदल होत असतात. उन्हाळ्यात तर घाम, चिकचिकीतपणा ही समस्या अधिक वाढते. अशावेळी त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, त्वचा सुरक्षित, चमकदार ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. तुमच्या विशेष प्रयत्नात या टिप्स नक्कीच कामी येतील. पाहुया कोणत्या आहेत या टिप्स...
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेतील ओलावा कमी होतो. अशावेळी त्वचा हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. त्वचा दिवसभर हायड्रेट ठेवण्यासाठी १०-१२ ग्लास पाणी प्या. त्याचबरोबर नियमित फळांचे सेवन करा. त्वचा फ्रेश, टवटवीत दिसेल.
रात्री झोपण्यापूर्वी त्वचा नीट स्वच्छ करा. त्यानंतर टोनिंग आणि माईश्चरायजिंग करा.
दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुवा. त्याचबरोबर आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्क्रब करा. त्यामुळे त्वचा व्यवस्थित स्वच्छ होईल व फ्रेश दिसेल.
उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे सुर्याच्या युव्ही किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.
चमकदार त्वचा हवी असल्यास मेकअपपासून दूर रहा. त्वचेचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी घाम वेळीच टिपून घ्या. चिकचिकीत झालेला चेहरा नियमित धुवा.
चेहरा टवटवीत आणि त्वचा नितळ ठेवण्यासाठी टॉमेटो-लिंबाचा रस नियमित चेहऱ्यावर लावा.
दूध, मध आणि चण्याचे पीठ एकत्र करुन पॅक बनवा. नियमित चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचा चमकदार होईल. त्वचेला तजेला येईल. इतकंच नाही तर फळांचा रसही तुम्ही फेसपॅक म्हणून लावू शकता. यामुळे त्वचेचे पोषण होऊन त्वचेचे सौंदर्य खुलण्यास मदत होईल.