रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या या २ भागांना लावा मोहरीचे तेल ; मिळतील अनेक फायदे

मोहरीच्या तेलाचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील. 

Updated: May 26, 2018, 08:25 AM IST
रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या या २ भागांना लावा मोहरीचे तेल ; मिळतील अनेक फायदे title=

मुंबई : मोहरीच्या तेलाचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील. डोक्यापासून पायापर्यंत मोहरीचे तेल अतिशय उपयुक्त आहे. म्हणून जर झोपण्यापूर्वी विशेषतः पुरुषांनी या दोन भागांना तेल लावल्यास त्याचे अनेक फायदे मिळतील. पहा शरीराच्या कोणत्या भागांना तेल लावणे फायदेशीर ठरेल. शरीरासाठी अतिशय फायदेशीर असलेल्या या तेलात व्हिटॉमिन, मिनरल्स आणि अन्य पोषकघटक असतात. रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावल्यास अनेक आजार दूर राहतील आणि त्वचेचा पोत सुधारुन त्वचाही उजळेल.

पायांचे तळवे

रात्री झोपण्यापूर्वी दररोज मोहरीचे तेल पायांच्या तळव्यांना लावा. हलक्या हाताने तळव्यांना मालिश करा. यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारेल. झोप चांगली लागेल. त्याचबरोबर पुरुषांचे शरीर स्वस्थ आणि मजबूत राहील.

नाभी

रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाचे काही थेंब नाभीत घाला. यामुळे ओठ फाटणार नाहीत. ओठ सुंदर आणि मुलायम राहतील. पोटांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर पचनक्रियाही सुरळीत होईल. 

जखम झाल्यास

याशिवाय शरीरावर जखम झाल्यास आणि ती बराच काळ ठीक न झाल्यास मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरेल. त्यामुळे जखमेवर मोहरीचे तेल नियमित लावा. जखम सुकून बरी होईपर्यंत तेल लावण्यात सातत्य असावे.