मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात केसांचं पोषण होणं खूप गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यामुळेच केस मोठ्या प्रमाणात गळतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याच्या आधीही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याआधी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकतात.
१. एरंडेल, ऑलिव्ह किंवा बदाम यापैकी दोन प्रकारचे तेल एकत्र करून लावावे. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल आणि केस गळणे थांबेल.
२. केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नये. गरम पाण्यामुळे तुमचे केस कडक आणि कोरडे होतात.
३. अंघोळीआधी केसांना दही आणि अंडं यांचे मिश्रण लावावे. हे मिश्रण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर मानले जाते. मध आणि दही यांचे मिश्रणही कंडिशनर म्हणून वापरता येईल.
४. काळी डाळ रात्री भिजत ठेवावी. त्यानंतर सकाळी ती व्यवस्थित वाटून त्यात अंडं, लिंबाचा रस आणि दही टाकून ती केसांना लावल्याने फायदा होतो.
५. केस धुण्यापूर्वी केसांना तेला लावून २० मिनिटं मालिश करावी.