दिवाळीत फटाके उडवताना इजा झाल्यास या ७ टीप्स लक्षात ठेवा

दिवाळीच्या दिवसांमध्ये लहान मुलं छोटे मोठे फटाके उडवण्याचा हट्ट हमखास करतात.

Updated: Oct 22, 2017, 07:21 PM IST
दिवाळीत फटाके उडवताना इजा झाल्यास या ७ टीप्स लक्षात ठेवा  title=

मुंबई : दिवाळीच्या दिवसांमध्ये लहान मुलं छोटे मोठे फटाके उडवण्याचा हट्ट हमखास करतात.

काही वेळेस पुरेशी काळजी घेऊनही अपघात होतात. अशावेळेस होणार्‍या लहान मोठ्या  जखमांना कसे हाताळावे याबाबतच्या या सात खास टीप्स नक्की लक्षात ठेवा. 

1. एखादी इजा झाल्यास तात्काळ थंड पाणी ओता. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. इजा फारच गंभीर असल्यास वेदना थोडी सुसह्य झाल्यानंतर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

2. लहानशा जखमांवर टुथपेस्टदेखील लावणं फायदेशीर ठरतं. मात्र तुमच्या टूथपेस्ट Fluoride घटक असणं आवश्यक आहे. यामुळे त्वचेमध्ये थंडावा राहण्यास मदत होते. 

3. फटाक्याचा चटका बसल्यास त्यावर काही दिवसांनी फोड येते.  अशा फोडांना सतत हात लावणं टाळा. तसेच त्यांना खुलं ठेवा. त्यावर बॅन्डेज लावू नका. 

4. लहानसा फोड फुटल्यास त्यावर अ‍ॅन्टीसेप्टिक ऑईनमेंट लावा. 

5. फटाके उडवताना जाताना फार घोळदार कपडे घालू नका. अंगभर सुती कपड्यांची निवड करा. म्हणजे चटकन आग पेटण्याचा धोका कमी होईल. 

6. इजा झालेल्या भागावरील कपडे, दागिने तात्काळ काढा. 

7. गंभीर जखम असल्यास फार वेळ घरगुती उपाय करू नका. घरीच रेंगाळत राहण्यापेक्षा तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.