स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये वाढतेय 'ही' समस्या!

स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या अतिरिक्त वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये निद्रानाशाची समस्या वाढू शकते. त्याचबरोबर दिवसातील २ तासांपेक्षा अधिक काळ मोबाईल, टॅबलेटवर घालवल्याने त्यांची झोप पूर्ण होणार नाही, असे अभ्यासातून दिसून आले आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 21, 2017, 05:14 PM IST
स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये वाढतेय 'ही' समस्या! title=

लॉस अँजलिस : स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या अतिरिक्त वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये निद्रानाशाची समस्या वाढू शकते. त्याचबरोबर दिवसातील २ तासांपेक्षा अधिक काळ मोबाईल, टॅबलेटवर घालवल्याने त्यांची झोप पूर्ण होणार नाही, असे अभ्यासातून दिसून आले आहे. 

किशोरवयीन मुलांना सात तासांपेक्षा अधिक झोप घेणे गरजेचे आहे. 

संशोधकांनी ३,६०,००० हुन अधिक किशोरवयीन मुलांवर सर्वेक्षण केले. त्यात सान डियेगो स्टेट यूनीवर्सिटीचे शोधार्थी देखील सहभागी आहेत. 

'स्लीप मेडिसीन' नावाच्या पत्रिकेत प्रकाशित अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जी किशोरवयीन मुले ऑनलाईन जितका अधिक वेळ घालवतील, तितकी त्यांची झोप अपुरी राहील. तितका वेळ त्यांना नीट झोप मिळणार नाही.