बॉयफ्रेंडशी लग्न झाल्यास या ५ गोष्टी बदलतात!

अनेक वर्षांची ओळख, मैत्री, प्रेम असले तरी लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात. 

Updated: May 26, 2018, 11:59 AM IST
बॉयफ्रेंडशी लग्न झाल्यास या ५ गोष्टी बदलतात! title=

मुंबई : अनेक वर्षांची ओळख, मैत्री, प्रेम असले तरी लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात. काही वेळेस तर नवरा आणि बायकोपेक्षा गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड अधिक असल्याचे भासते. तर काही वेळेस नवरेशाही जाणवते. अनेक बदल हे सकारात्मक असतात. तर नकारात्मक गोष्टी तुम्ही समजुदारपणाने विचारपूर्वक बदलू शकता. त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जाणून घेऊया बॉयफ्रेंडसोबत लग्नानंतर आयुष्यात नक्की काय बदल होतात...

कुटुंब म्हणून ओळख

लग्न झाल्यानंतर तुमच्या दोघांचे मिळून एक कुटुंब तयार होते. तुमच्या वैयक्तिक गोष्टींकडे देखील कौटुंबिक दृष्टिकोनातून बघितले जाईल. पती किंवा पत्नी म्हणून तुमच्या सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील. तुम्हाला एकत्रितपणे निर्णय घ्यावे लागतील. 

प्रेमाला वेगळा बहर

फिरायला जाणे, एकत्र कॉफी घेणे, रात्रभर चॅटिंग करणे या पलीकडे देखील प्रेम असते, याची तुम्हाला जाणीव होईल. लग्नानंतर प्रेमाला नवा अर्थ प्राप्त होतो. समजुदारपणा, नवीन गोष्टी स्वीकारणे गरजेचे असते. एकाच घरात राहिल्याने तुम्ही फक्त शारीरिकरीत्या नाही तर मानसिकरीत्या देखील अधिक जवळ येता. लग्नानंतर प्रेम वेगळ्या पद्धतीने बहरत जातं. 

सेक्सच्या पलीकडील प्रेमाचा अनुभव

लग्नानंतर सेक्सचा अनुभव नक्कीच तुम्ही अधिक वेळ घेत असाल. तरी कधी काही कारणास्तव सेक्सपासून वंचित राहत असाल. कधी कामाच्या व्यापात सेक्सचा मूड होत नसेल. आणि कालांतराने नाते इतके सक्षम, समजुदार होते की प्रत्येक वेळेस प्रेम व्यक्त करण्यासाठी सेक्सची गरज भासत नाही. म्हणजेच सेक्सच्या पलीकडे पोचलेल्या प्रेमाचा तुम्ही अनुभव घेता. 

अडजस्टमेंट्स

लग्नापूर्वी अनेक गोष्टी आपण ठरवतो. पण सगळे तसेच घडते असे नाही. वेळेनुसार तुम्हाला अनेक अडजस्टमेंट्स कराव्या लागतात. कारण त्यावेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा विचार सगळ्यात आधी करावा लागतो. 

गुड न्यूज

लग्नानंतर लगेचच ‘गुड न्यूज’ ऐकण्यासाठी सगळे आतुर होतात. तसे प्रश्न देखील विचारले जातात. सल्ले देखील दिले जातात. सेक्सनंतर चेहऱ्यावर येणार ग्लो किंवा दोघांच्या बॉन्डिंग आणि प्रेमामुळे खुललेला चेहरा पाहून अनेकांना तुम्ही गरोदर आहात, असे वाटू लागते.