High Blood sugar levels: ब्लड शुगरची पातळी वाढताच दिसून येतील 'ही' लक्षणं; चुकूनही दुर्लक्ष करू नका!

Understanding High Blood sugar levels without test: रक्तातील शुगर लेव्हल आणि त्यामध्ये होणारे चढ उतार यांचं परीक्षण करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. मात्र शरीरातील काही बदल रक्तातील शुगर लेवलची उच्च पातळी दर्शवतात. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 22, 2024, 04:10 PM IST
High Blood sugar levels: ब्लड शुगरची पातळी वाढताच दिसून येतील 'ही' लक्षणं; चुकूनही दुर्लक्ष करू नका! title=

Understanding High Blood sugar levels without test: मधुमेही रूग्णांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. यावेळी मधुमेही रूग्णांना एक चिंता सतत त्रास देत असते ते म्हणजे ब्लड शुगर लेवलमध्ये होणारी सतत वाढ. मधुमेह मॅनेजमेंटसाठी ब्लड शुगर कमी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी किंवा जास्त असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांची गुंतागुंत वाढू शक्यता असते. 

रक्तातील शुगर लेव्हल आणि त्यामध्ये होणारे चढ उतार यांचं परीक्षण करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. मात्र शरीरातील काही बदल रक्तातील शुगर लेवलची उच्च पातळी दर्शवतात. यावेळी जेव्हा तुमच्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढते तेव्हा शरीरात काही खास लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत. 

तोंड सुकणं

तोंडात लाळ पुरेश्या प्रमाणात तयार झाली नाही की तोंड सुकू लागतं. यावेळी तुमचं तोंड सतत कोरडं पडू लागतं. हे हाय ब्लड शुगर लेवल एक लक्षण असू शकतं.

दृष्टी धुसरं होणं

रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे नसा आणि धमन्या खराब होतात. त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शक्यात असते. यामुळे डोळ्यांतील सूज देखील वाढू शकते. त्यामुळे जर दृष्टी धुसरं झाली असेल तर तातडीने डॉक्टरांची मदत घ्यावी. 

सतत भूक लागणं

रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त झालं की रूग्णाला सतत भूक लागण्याची शक्यता असते. अनेक वेळा रूग्णाला जेवल्यानंतरही लगेच भूक लागते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत पॉलीफेजिया असंही म्हणतात.

वारंवार थकवा येणं

वाढलेल्या ग्लुकोजच्या पातळीमुळे शरीरातील टिश्यू आणि स्नायूंना एनर्जी मिळत नाही. अशावेळी रूग्णाला थकवा जाणवू शकतो. अशा स्थितीत विश्रांती घेतल्यानंतरही खूप थकवा जाणवू शकतो.

सतत तहान लागणं

रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्याने तुमची तहान देखील वाढू शकते. साखरेची पातळी वाढल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. यामुळे तुम्हाला वारंवार तहान लागू शकते. जर तुम्हाला वारंवार पाणी प्यावेसं वाटत असेल तर तुम्ही तुमची रक्त तपासणी करावी.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)