मुलांच्या 'या' 6 सवयींना पसंत करतात मुली, त्या कोणत्या आहेत? जाणून घ्या

आत्मविश्वास ही पहिली गोष्ट आहे, ज्या बहुतेक मुली मुलांमध्ये शोधतात.

Updated: Jul 19, 2022, 09:48 PM IST
मुलांच्या 'या' 6 सवयींना पसंत करतात मुली, त्या कोणत्या आहेत? जाणून घ्या title=

मुंबई : आजच्या काळात मुला-मुलींची मैत्री खूप सामान्य आहे. परंतु बहुतेक मुलांना हे माहित नसते की, मुली त्यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी लक्षात ठेवतात. कधी मुलींना मुलांच्या काही सवयी आवडतात, तर काही सवयी अजिबात आवडत नाहीत. अशा परिस्थितीत मुली मुलांबद्दल एक मत बनवतात आणि मग त्या प्रमाणेच त्या मुलासोबत वागतात. अशावेळी मुलांना देखील हे जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते की, मुलींना मुलांच्या कोणत्या सवयी आवडतात? ज्यामुळे त्यांना मुलींच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी फायदा होईल.

आत्मविश्वास ही पहिली गोष्ट आहे, ज्या बहुतेक मुली मुलांमध्ये शोधतात. जर एखादा मुलगा खूप आत्मविश्वासी असेल आणि त्याचा स्वतःवर विश्वास असेल, तर मुली त्याला लवकर पसंत करतात. ही गुणवत्ता मुलांना अधिक आकर्षक बनवते. आत्मविश्वास असलेल्या मुलाच्या आसपास राहिल्याने मुलींना असे वाटते की, त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो.

बऱ्याचदा मुली या मुलांच्या ड्रेसिंग सेन्सवरून अंदाज लावतात की, समोरची व्यक्ती स्वतःकडे किती लक्ष देते.

मुली स्वभावाने अतिशय संवेदनशील आणि भावनिक असतात. मुलींना नेहमी मुलांनी त्यांचे ऐकावे असे वाटते. तुम्हाला मुलीचे बोलणं ऐकायला आवडो किंवा नाही, पण तरीही तुम्ही तिचे ऐकावे अशी मुलीची इच्छा असते. जर तुम्ही असे केले तर तुम्ही त्यांची आवडती व्यक्ती बनू शकता.

कंटाळवाणा जोडीदार कोणालाही आवडत नाही. त्यामुळे समोरील व्यक्ती खूपच मजेदार असणे आवश्यक आहे. जर एखादा मुलगा नेहमी हसत असेल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना हसवत असेल तर तो मुलींना खूप आकर्षित करतो.

करिअरमध्ये यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मुलाकडे मुली जास्त आकर्षित होतात. मुलीला तुमच्या पगाराची आणि स्थितीची अजिबात चिंता नसली, तरी तुमच्या करिअरवरून फक्त तुमची गंभीरता आणि परिपक्वता कळते.

मुले मुलीला तेव्हाच प्रभावित करू शकतात, जेव्हा ते समोरच्या व्यक्तीचा आदर करतात. त्यांनी मुलींसाठी काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडा, जेव्हा मुलीला थंडी वाजते तेव्हा तिला तुमचे जाकीट द्या. हे सगळं ऐकायला थोडं फिल्मी नक्कीच आहे, पण मुलींना या सगळ्या गोष्टी खूप आवडतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)