पावसाळ्यात आईस्क्रीम खाणं ठरु शकतं महागात, 'या' आजारांना मिळेल आमंत्रण

Ice Cream Side Effects : पावसाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खाण्याची ईच्छा ही अनेकांमध्ये निर्माण होते. आज कुछ तुफानी करते है असं म्हणत अनेक जन त्यांची ही इच्छा पुर्ण करतात. पण असं केल्याने तुमच्या शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे नेमके काय तोटे होऊ शकतात?

Updated: Jul 19, 2022, 07:46 PM IST
पावसाळ्यात आईस्क्रीम खाणं ठरु शकतं महागात, 'या' आजारांना मिळेल आमंत्रण title=

Ice Cream Side Effects : उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणं हे सर्वांनाच आवडतं. पण जर आपण पावसाळ्यात आइस्क्रीम खाल्ल तर शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. जर तुम्हीही पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे शौकीन असाल तर याचे नेमके काय दुष्परिणाम आहेत ते नक्की जाणून घ्या. उदाहरणार्थ, घशासाठी आईस्क्रीम खाणं कोणत्याही ऋतूत फायदेशीर मानलं जात नाही.अशा परिस्थितीत पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याचं काय काय नुकसान होऊ शकतं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे तोटे :-

 

छातीत त्रास जाणवतो

पावसाळ्यात वातावरणातलं तापमान वाढल्यालं असतं. या काळात ते सर्व पदार्थ खाणं टाळावं, ज्यामुळे शरीराला ऊब मिळते. आईस्क्रीमचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, छातीत जड होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात मिठाई खाण्याची इच्छा झालीचं तर अशा वेळी तुम्ही हलव्याचं सेवन करू शकता. पावसाळ्यात तुम्ही मूग डाळ तुपात भाजून आरोग्यदायी खीर बनवून खाऊ शकता.

डोकेदुखीचा त्रास वाढतो

पावसाळ्यात आईस्क्रीम, थंड पाणी किंवा बर्फाचे सेवन केल्यानं मेंदू गोठू शकतो. आईस्क्रीम थंड आहे आणि थंड पदार्थ सेवन केल्याने मेंदूच्या नसांवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते. ज्या लोकांना सायनसची समस्या आहे त्यांनी पावसाळ्यात आईस्क्रीम खाणं टाळावं.

घशाचा संसर्ग होण्याची शक्यता

पावसाळ्यात आईस्क्रीमच्या अतिसेवनामुळे घशाचा संसर्ग होऊ शकतो. आईस्क्रीम खाल्ल्याने घशाच्या संसर्गासोबत कफाची समस्या देखील होऊ शकते. कफामुळेही खोकला आणि ताप येऊ शकतो. पावसाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने घशाचा संसर्ग होऊ शकतो.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)