High Cholesterol : नसांमध्ये कोलेस्ट्रॉल फसलं असले तर पायाचे केस देतात 'हे' संकेत! जाणून घ्या

मुख्य म्हणजे, शरीरातील प्रत्येक पेशीला सामान्य प्रमाणात कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. यांचं काम हार्मोन्स, जीवनसत्त्वं आणि पाचक द्रव तयार करण्यास मदत करणं हे असतं. मात्र यावेळी याची पातळी वाढली की, शरीरात बदल दिसून येतात. खासकरून हे बदल केसांबाबत असतात.

Updated: Apr 5, 2023, 08:51 PM IST
High Cholesterol : नसांमध्ये कोलेस्ट्रॉल फसलं असले तर पायाचे केस देतात 'हे' संकेत! जाणून घ्या title=

Symptoms Of Increased Cholesterol: सध्याच्या जीवनशैलीमुळे आपल्या मागे अनेक समस्या लागतात. यामध्ये आजकाल सर्वात जास्त सतावणारी समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल (Cholesterol). आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) वाढलं की, तुमच्या हृदयाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. यामुळे हार्ट अटॅक येण्याचा देखील धोका असतो. डॉक्टर देखील आपल्याला तळलेले किंवा अधिक फॅटयुक्त पदार्थ खाणं टाळण्याचा सल्ला देतात. 

मुख्य म्हणजे, शरीरातील प्रत्येक पेशीला सामान्य प्रमाणात कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. यांचं काम हार्मोन्स, जीवनसत्त्वं आणि पाचक द्रव तयार करण्यास मदत करणं हे असतं. मात्र यावेळी याची पातळी वाढली की, शरीरात बदल दिसून येतात. खासकरून हे बदल केसांबाबत असतात.

पायांवरील केस गळू लागतात

जर मानवी शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर पेरिफेरल आर्टरी डिसिज होण्याची शक्यता असते. या समस्येमध्ये तुमच्या शिरांच्या माध्यमातून पुरेसं रक्त पायापर्यंत पोहोचत नाही. परिणामी यामुळे अनेकदा पायांवरचे केस गळायला सुरुवात होते. 

याबाबत संशोधकांनी एक संशोधन केलं. जॉन्स हॉपकिन्स इथल्या संशोधकांनी उंदरांवर हे संशोधन केलं असून यामध्ये काही उंदरांना उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च चरबीयुक्त आहार देण्यात आला. तर दुसऱ्या उंदरांच्या गटाला चांगला आरोग्यदायी आहार देण्यात आला. 

संशोधनातून काय समोर?

हे संशोधन पूर्ण झाल्यानंतर असं लक्षात आलं की, ज्या उंदरांना जास्त फॅट आणि कोलेस्ट्रॉल असलेला आहार देण्यात आला होता त्यांचे केस अकाली पांढरे होतात झाले होते. तर काहींचे केस गळू लागले होते. 'सायंटिफिक रिपोर्ट्स'मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. 

संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, उंदरांना जास्त फॅट आणि कोलेस्ट्रॉल असलेला आहार दिल्याने वयाच्या 36 आठवड्यांपासून केस गळती होऊ लागल्याचं समोर आलं. यामध्ये संशोधकांना उच्च कोलेस्ट्रॉलयुक्त आहारामुळे केस पांढरे होणे तसंच केस गळणाऱ्या पुरुषांसाठी समान नमुना आढळला.

कोलेस्ट्रॉल लेवल कोणत्या वयामध्ये तपासणी पाहिजे?

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, एखाद्या व्यक्तीने वयाच्या 20 व्या वर्षी रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासली गेली पाहिजे. तर दुसरीकडे यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, लहान वयातच मुलांनी कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणं फायदेशीर ठरू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी दर 5 वर्षांनी त्यांच्या कोलेस्टेरॉलची चाचणी केली गेली पाहिजे.