Mango for Weight Loss: वजन कमी करायचं? मग उन्हाळ्यात या 4 पद्धतीने खा आंबा!

Weight Loss : उन्हाळा सुरू होताच सर्वजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अंबामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियम अशी अनेक खनिजे असतात. त्यामुळे उन्हाळ्यात कोणत्या प्रकारे आंबे खावेत जाणून घ्या... 

Updated: Apr 5, 2023, 03:37 PM IST
Mango for Weight Loss: वजन कमी करायचं? मग उन्हाळ्यात या 4 पद्धतीने खा आंबा!   title=
Mango for Weight Loss

Mango for Weight Loss: उन्हाळा महिना सुरू होताच आंबा बाजारात येण्यास सुरुवात होते. आंबा हा फळाचा राजा म्हणून ओळखला जातो. सर्वात प्रिय असणाऱ्या या फळाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. खरं तर, अंबामध्ये सर्व पोषक तत्व आढळतात, जे शरीराच्या सर्व अवयवांच्या कार्यासाठी आवश्यक असतात. केळी आणि आंबा हे वजन कमी करण्यासाठी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. आंबा हे वजन कमी करण्यासाठी योग्य फळ नाही, असे अनेकदा सांगितले जाते, पण ते मुळीच खरे नाही. पण, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आहारात आंब्याचा समावेश करून तुम्हीही वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया, वजन कमी करण्याच्या प्रवासात कोणत्या प्रकारे आंब्याचा समावेश करावा.

मँगो ओट्स स्मूदी

साहित्य : 2 चमचे ओट्स, 1 आंबा, 1 चमचे चिया बिया, 1 ग्लास पाणी.

कृती : एक पॅन घ्या, त्यात 1 ग्लास पाणी घाला. आता त्यात ओट्स आणि चिया बिया एकत्र उकळा. नंतर थंड होऊ द्या. मिश्रण ब्लेंडरमध्ये बारीक करा. या मिश्रणात चिरलेला आंबाही घाला. नंतर बारीक करून घ्या. मँगो ओट्स स्मूदी तयार आहे.
 

वाचा: सोने 60 हजारांवर, चांदीने पार केला 75 हजारांचा टप्पा    

 

दलियामध्ये आंब्याचा समावेश करा

साहित्य : 50 ग्रॅम नारळ (किसलेले), 1/2 कप नारळाचे दूध, 150 ग्रॅम ओट्स, 1 पिकलेला आंबा, 1 चमचा ड्राय फ्रूट्स, 1 चमचा मध, 1 चमचा वेलची पावडर.

कृती : एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करा आणि रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण चांगले मिसळा. नाश्ता मध्ये समाविष्ट करू शकता.

आंब्याची कोशिंबीर बनवा

साहित्य : पालक ची पाने, 1 पिकलेला आंबा, मूठभर पाइन नट्स, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, 1 टेबलस्पून मध, काळी मिरी

कृती : सर्वप्रथम पालक ची पाने नीट धुवून घ्या. आता आंब्याचे पातळ काप करा. एका प्लेटमध्ये थोडे तेल चांगले पसरवा. आता त्यात पालक ची पाने, पाइन नट्स टाका, वर आंब्याचे तुकडे टाका. सर्व साहित्य एकत्र करून सॅलड तयार करा. वजन कमी करण्याच्या प्रवासात त्याचा समावेश केला जाऊ शकतो.