गर्भधारणेदरम्यान थायरॉइड झाल्यास कोणत्या चाचण्या महत्त्वाच्या, बाळासाठीही फायदेशीर

अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान थायरॉइडची समस्या जाणवते. तसेच गर्भधारणे दरम्यान अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये थायरॉइडची देखील चाचणी करतात. डॉ. अजय शाह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 25, 2024, 10:00 AM IST
गर्भधारणेदरम्यान थायरॉइड झाल्यास कोणत्या चाचण्या महत्त्वाच्या, बाळासाठीही फायदेशीर  title=

अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान थायरॉइडची समस्या जाणवते. तसेच गर्भधारणे दरम्यान अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये थायरॉइडची देखील चाचणी करतात. डॉ. अजय शाह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

मातेचे आरोग्य, गर्भाचा विकास यासाठी मातेचे थायरॉईड हार्मोन्स महत्वाचे असल्यामुळे गर्भधारणे दरम्यान थायरॉईड फंक्शन महत्वाची भूमिका बजावते. गर्भधारणे दरम्यान हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम सह कोणत्याही प्रकारचे थायरॉईड फंक्शन बिघडण्याने माता व बालक या दोघांवर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे काही विशिष्ट चाचण्या करून थायरॉईड आरोग्याची तपासणी करणे दोघांसाठी हितावह असते. 

थायरॉईड फंक्शन टेस्ट्स

थायरॉईड स्टीम्युलेटींग हार्मोन (टीएसएच) चाचणी: पिट्यूटरी ग्रंथी टीएसएचची निर्मिती करते आणि थायरॉईड हार्मोन्स तयार करण्यासाठी थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) च्या प्रभावामुळे गर्भधारणे दरम्यान टीएसएच पातळी नैसर्गिकरित्या कमी होते, त्यामुळे काहीवेळा थायरॉईड फंक्शन मध्ये  झालेला बिघाड लक्षात येऊ शकत नाही. टीएसएचची पातळी वाढलेली असल्यास हायपोथायरॉईडीझम ची शक्यता, पातळी कमी असल्यास हायपरथायरॉईडीझम ची शक्यता असते.

फ्री थायरॉक्सिन (एफटी4) चाचणी: एफटी4 हा रक्तप्रवाहात फिरत असलेला थायरॉईड हार्मोन्सचा सक्रिय प्रकार आहे. एफटी4 पातळी तपासल्याने थायरॉईड कार्याचे अधिक अचूकपणे मूल्यांकन करण्यात मदत होते, विशेषत: टीएसएच पातळीच्या संयोगाने. एफटी4 पातळी वाढलेली असल्यास हायपोथायरॉईडीझमची शक्यता, पातळी कमी असल्यास हायपरथायरॉईडीझमची शक्यता असते.

टोटल थायरॉक्सिन (टी4) चाचणी: टोटल टी4 मध्ये रक्तातील बाउंड आणि अनबाउंड प्रकारच्या थायरॉईड हार्मोन्सचा समावेश असतो. तर टोटल टी4 मध्ये थायरॉईडच्या एकूण फंक्शन बद्दल माहिती मिळते. त्यांच्यावर गर्भधारणे दरम्यान होणाऱ्या बाईंडिंग प्रोटिन सारख्या बदलांचा प्रभाव असू शकतो. त्यामुळे थायरॉईड अवस्था जाणून घेण्यासाठी एफटी4 पातळी मोजली जाते. 

थायरॉईड अँटीबॉडी चाचण्या: थायरॉईड पेरोक्सिडेस ऍन्टीबॉडीज (टिपीओएबी) आणि थायरोग्लोबुलिन ऍन्टीबॉडीज (टीजीएबी) यासारख्या थायरॉईड अँटीबॉडीज या हाशिमोटोचा थायरॉईडाइटिस आणि ग्रेव्हस डिसीज ऑटोइम्यून थायरॉईड विकारांचे मार्कर्स आहेत. गर्भधारणे दरम्यान वाढलेल्या ऍन्टीबॉडी पातळी मुळे थायरॉईडचे कार्य बिघडण्याची शक्यता वाढते आणि त्याचे गर्भधारणेवर, गर्भपात, किंवा मुदतपूर्व प्रसूती आणि प्रीक्लॅम्पसिया यासारखे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. 

(हे पण वाचा - World Thyroid Day : थायरॉइड दरम्यान काय खावे-काय टाळावे?)

गर्भधारणे दरम्यान थायरॉईड चाचण्यांचे महत्व

मातेचे आरोग्य चांगले रहावे : गर्भधारणेदरम्यान थायरॉईड कार्य बिघडल्यास गर्भपात, गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब, मुदतपूर्व प्रसूती आणि बाळामध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल विकार यासारखे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आधीच थायरॉईड डिसऑर्डरचे निदान करून त्यावर उपचार केल्याने धोका टाळता येतो किंवा शक्यता कमी करता येते आणि आई व बाळाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. 
थायरॉईडच्या औषधांच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे: गर्भधारणे दरम्यान थायरॉईडचे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी ज्या महिलांना आधीपासूनच थायरॉईड डिसऑर्डर्स आहेत त्यांच्या थायरॉईडच्या औषधांच्या प्रमाणामध्ये बदल करण्याची गरज भासू शकते. थायरॉईड हार्मोन्स पातळीवर नियमित लक्ष ठेवल्याने अडचणी टाळण्यासाठी औषधांच्या प्रमाणात योग्य ते बदल करता येऊ शकतात. 
गर्भावस्थेत थायरॉईड विकार झाल्याचे समजणे: काही स्त्रियांच्या बाबतीत गर्भधारणे दरम्यान प्रथमच थायरॉईड फंक्शन बिघडते.  ज्याला गर्भधारणा थायरॉईड विकार म्हणतात. थायरॉईड फंक्शनची नियमित  चाचणी केल्यास हा विकार झाल्याचे वेळीच समजून त्यावर उपाययोजना आखण्यास मदत होते. ज्यामुळे माता आणि गर्भाच्या आरोग्यावरील संभाव्य प्रतिकूल परिणाम कमी होतात.
प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी: प्रसूतीनंतरच्या काळात थायरॉईड कार्याचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. खासकरून अशा महिलांचे ज्यांना याआधी थायरॉईड फंक्शन बिघडणे किंवा ऑटोइम्यून थायरॉईड सारखा त्रास झालेला आहे. प्रसुति नंतर थायरॉईडचे आरोग्य तपासल्याने थायरॉइड फंक्शन मध्ये काही अडचण निर्माण झाल्यास वेळेवर उपचार करणे शक्य होते, प्रसुतिपश्चात थायरॉईडायटीस आणि इतर गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो.

आई आणि बाळ दोघांच्या उत्तम आरोग्यासाठी गर्भधारणे दरम्यान थायरॉईडचे आरोग्य तपासण्यासाठी थायरॉईड फंक्शन चाचण्या आवश्यक साधने आहेत. थायरॉईड विकारांचे नियमित निरीक्षण आणि योग्य व्यवस्थापन करणे. आईचे आरोग्य चांगले ठेवण्यात आणि गर्भधारणेचे प्रतिकूल परिणाम रोखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.