या '३' लक्षणांवरुन जाणा तुम्ही मीठाचे अधिक सेवन करता!

तुम्ही अधिक मीठ तर खात नाही ना?

Updated: Aug 10, 2018, 08:57 AM IST
या '३' लक्षणांवरुन जाणा तुम्ही मीठाचे अधिक सेवन करता! title=

मुंबई : पदार्थात मीठ नसेल तर तो अगदी बेचव लागतो. त्यामुळे अन्नाचे मीठाचे आवश्यक ते प्रमाण असणे गरचेजे आहे. पण गरजेपेक्षा अधिक मीठ खाणे आरोग्यास हानीकारक ठरेल. काही लोकांना भाजी, सलाड, रायता यात वरुन मीठ घालून खाण्याची सवय असते. इतकंच नाही तर काही लोक फळांना देखील मीठ लावून खातात. त्यामुळे चव तर वाढते पण मीठातील सोडिअमच्या अधिक प्रमाणामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अधिक मीठ खाल्याने शरीरावर ही लक्षणे दिसू लागतात. पाहुया काय आहेत ती लक्षणे...

शरीराच्या वेगवेगळ्या भागांना सूज

रात्रीच्या वेळी गरजेपेक्षा अधिक मीठ खाल्यास शरीरावर अनेक परिणाम दिसू लागतात. शरीरातील वेगवेगळ्या भागात विनाकारक सुज जडू लागते. यास इडिमा असे म्हणतात.

अधिक तहान लागते

मीठाच्या अधिक सेवनामुळे तहान अधिक लागते. शरीरातील सोडिअमचे प्रमाण वाढल्याने पाण्याची अधिक आवश्यकता भासू लागते. कारण सोडिअमचे वाढलेले प्रमाण शरीरातून बाहेर पडण्यासाठी शरीरात हे बदल होतात. 

सुजलेले डोळे

सकाळी उठल्यावर तुमचे डोळे सुजलेले दिसत असतील तर हा तुम्ही अधिक मीठ घेत असल्याचा इशारा आहे. पण पफी आईजची समस्या विविध कारणांमुळेही उद्भवू शकते.