मुंबई : पावसाळा कितीही अल्हाददायी वाटला तरी सोबतीला आजारपण घेऊनच येतो. त्यामुळे आजारपण, इंफेक्शन टाळावे म्हणून आपणच विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध उपाय आपल्याकडे आहेत. त्यातील एक म्हणजे पुदीना. पुदीन्याचे अनेक फायदे आपण जाणतो. पुदीन्याची चटणी तशी सर्वांच्याच आवडीची. पण तुम्ही पुदीन्याचा चहा कधी ट्राय केलाय का? तर जाणून घेऊया यामुळे होणारे फायदे आणि चहा करण्याची पद्धत...
८-१० पुदीन्याची पाने
अर्धा छोटा चमचा काळीमिरी
अर्धा छोटा चमचा काळं मीठ
२ कप पाणी
पुदीन्याचा चहा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळवून घ्या. त्यानंतर त्यात पुदीन्याची पाने, काळीमिरी आणि काळं मीठ घाला आणि ५ मिनिटे उकळवा. पुदीन्याचा चहा तयार. गाळून घ्या आणि प्या.