Salt Side Effect in Marathi : स्वयंपाक घरातील जेवण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ...जेवणात जरा तरी मीठ कमी झालं तर जेवण बैचव लागतं. जेवणात मीठ कमी झालं तर आपण वरुन मीठ (Salt) घेतो. काही लोकांना तर जेवण्याची चव न घेतातच त्या पदार्थावर आधीच मीठ घालतो. लहानपणापासून अनेकांनी हे वाक्य ऐकलं असेल अरे जास्त मीठ खाऊ नकोस रक्ताचं पाणी होतं. मिठाने जेवणाची चव तर वाढतेच शिवाय योग्य प्रमाणात मीठ खाल्ल्यास (Side Effects Of Consuming Too Much Salts) आपलं शरीर निरोगी राहतं. पण हेच मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्या शरीरावर दृष्परिणाम (Side Effects of Salt) होतात. हे दृष्परिणाम ऐकून तुम्हाला धक्का बसेल. (Disadvantages of Eating More Salt)
जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) धोका निर्माण होतो. रक्तदाबामुळे (High BP) अनेक आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दृष्टी कमी होऊ शकते, हृदयवरील ताण वाढतो त्यामुळे हृदयविराकाराच झटका येण्याची भीती उद्भवते. (Side Effect Consuming too mumch salt jyada namak khane ke nuksan in marathi)
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण जेवणात जास्त मीठ खाल्ल्यामुळे लठ्ठपणाची समस्या होते. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं आणि तुमच्या शरीरातील चरबीही वाढते.
जास्त मीठ खाल्ल्यामुळे सोडियम शरीरात जातं. त्यामुळे मूत्रपिंडाला सोडियम पचविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागते. याचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर होतो. ( What are 6 negative health effects of salt)
तज्ज्ञांच्या मते जास्त मीठ खाल्लामुळे पायावर आणि चेहऱ्यावर सूज येते.
जास्त मीठ खाल्ल्यामुळे अनेकांना वारंवार लघवीची समस्या जाणवते. UTI, टाइप 2 मधुमेह आणि अतिक्रियाशील मूत्राशय यासारख्या अनेक आजार हे जास्त मीठ खाल्ल्यामुळे होतात.
जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला बहुतेक वेळा तहान (Water Retention) लागते. कारण सोडियम हे तुमच्या शरीराचं संतुलन बिघडवतं. त्यामुळे तुम्हाला सतत पाणी प्यावसं वाटतं. (Dehydration)
मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं दिवसभरात किती मीठ खायला हवं. तर WHO च्या मते, आपण आपण दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा (Heart Attack, Heart Disease) धोका वाढतो. 'डब्ल्यूएचओ' कडून (World Health Organization) एका रिसर्च करण्यात आला ज्यानुसार लोक दररोज 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)