मधुमेही रूग्णांनी आंबा खावा का? जाणून घ्या किती प्रमाणात खावा

आंबा हा आरोग्यासाठीही हितकारक असून यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

Updated: Jun 23, 2021, 01:26 PM IST
मधुमेही रूग्णांनी आंबा खावा का? जाणून घ्या किती प्रमाणात खावा title=

मुंबई : फळांचा राजा आंबा कोणाला खाण्यासाठी आवडत नाही. आंबा हा आरोग्यासाठीही हितकारक असून यामध्ये अनेक पोषक घटक असतात. मात्र मधुमेही रूग्ण आंब्यापासून चार हात लांब राहणचं पसंत करतात. आंबा नैसर्गिक गोड असल्याने तो खावा की खाऊ नये या दुविधेत मधुमेही रूग्ण असतात. तर आज जाणून घेऊया आंबा खाल्ल्याने ब्लड शुगर वाढते का आणि किती प्रमाणात मधुमेही रूग्णांनी आंबा खाल्ला पाहिजे.

आंब्यामध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमीन आणि मिनरल्स असतात. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. एक कप कापलेल्या आंब्यामध्ये 99 कॅलरी, 1.4 ग्राम प्रोटीन, 25 ग्राम कार्ब,  22.5 ग्राम साखर, 2.6 ग्राम फायबर, 67% व्हिटॅमीन C, 18% फोलेट, 10% व्हिटॅमीन A  आणि 10% व्हिटॅमीन E असतं. त्याचप्रमाणे यामध्ये कॅल्शिय, झिंक आणि मॅग्नेशियम असतं. 

आंब्याचा ब्लड शुगरवर होणारा परिणाम

आंब्यामध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त कॅलरी त्याच्या गोडव्यामुळे येते. याच कारणाने मधुमेही रूग्णांमध्ये ब्लड शुगर वाढतं. मात्र त्याचप्रमाणे आंब्यामध्ये फायबर आणि कित्येक पद्धतीचे एन्टीऑक्सिडंट असतात जे ब्लड शुगरवर होणारा परिणाम कमी करतं.

आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स

कोणत्याही खाण्याच्या पदार्थाचा रक्तातील साखरेवर परिणाम हा त्याच्या ग्लाइसेमिक इंडेक्सवरून ओळखला जातो. हे 0-100 च्या प्रमाणात मोजलं जातं. 55 पेक्षा कमी असणारं कोणत्याही अन्नपदार्थाला कमी साखरेचं मानलं जातं. हे पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांना खाण्यासाठी योग्य मानले जातात. आंब्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स रँक 51 म्हणजे मधुमेह रूग्ण आंबा खाऊ शकतात.

मात्र लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की, प्रत्येकाचं शरीर काही पदार्खांना विविध पद्धधतीने प्रतिक्रिया देतं. त्यामुळे मधुमेही रूग्णांना जर आंबा खाण्याची इच्छा असेल तर सावधानीपूर्वक आहारात आंब्याचा समावेश करावा. 

यासंदर्भात झी 24 तासशी बोलताना मुंबईतील मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे म्हणाले, "मधुमेहींनी आंबा खावा मात्र त्याचं प्रमाण लिमिटेड ठेवावं. मुख्य म्हणजे मधुमेही रूग्णांनी आंब्याचा आहारात समावेश करायचा असेल तर त्यांच्या डॉक्टरांशी जरूर बोललं पाहिजे. त्यांच्या सल्ल्याने आंबा खावा की खाऊ नये हे ठरवावं. प्रामुख्याने मधुमेही रूग्णांनी एका दिवसाला आंब्याची एक फोड खाल्ली तर ठीक मानलं जातं."