कोरोना लस घेतल्यानंतर 'इतक्या' महिलांमध्ये दिसून आल्या पिरीयड्ससंदर्भात तक्रारी!

कोरोना लस घेतल्यानंतर समोर येणाऱ्या साईड इफेक्टवर सर्वांचं लक्ष आहे. 

Updated: Jun 23, 2021, 09:44 AM IST
कोरोना लस घेतल्यानंतर 'इतक्या' महिलांमध्ये दिसून आल्या पिरीयड्ससंदर्भात तक्रारी! title=

मुंबई : जगभरात पसरणाऱ्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना लस घेतल्यानंतर समोर येणाऱ्या साईड इफेक्टवर सर्वांचं लक्ष आहे. अशातच डेली मेलच्या एका अहवालानुसार, ब्रिटनमध्ये साधारणतः 4000 महिलांनी लस घेतल्यानंतर त्यांना मासिक पाळीसंदर्भातील समस्या ओढावल्या आहेत. 

लसीकरणासंबंधी माहिती असलेल्या आणि त्यावर लक्ष केंद्रित असलेल्या तज्ज्ञांनी असा दावा केला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, प्रामुख्याने 30 ते 49 वयोगटातील महिलांना लसीकरण केल्यानंतर मासिक पाळीसंदर्भात अधिक समस्या दिसून आल्या.

अहवालानुसार, महिलांना मासिक पाळीदरम्यान सामान्यपणे होणाऱ्या रक्तस्रावापेक्षा अधिक रक्तस्राव होत होता. तर काही महिलांना पिरीयड्स उशीरा आले असल्याचंही जाणवलं. एस्ट्राजेनेका लसीसंदर्भात हा दावा कऱण्यात आलेला नाही. तर फायझर वॅक्सिन घेतल्यानंतर 1158 प्रकरणांमध्ये मासिक पाळीत बदलाव झाल्याचं समोर आलंय. 

युनायटेड किंग्डमच्या मेडिसीन एन्ड हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजेन्सीचे डॉ. जून राईने यांच्या म्हणण्याप्रमाणे, "आम्ही आरोग्य तज्ज्ञांच्या मदतीने मेंस्ट्रुअल डिसॉर्डर, अनियमित रक्तस्राव आणि लसीकरणाचे साईड इफेक्ट यांच्या रिपोर्ट्स अभ्यास केला. दरम्यान ब्रिटनमधील तिन्ही लसींचे आकडे या समस्यांचा धोका वाढू शकेल याबाबत इशारा देत नाहीत. अशा फार कमी महिला आहेत ज्यांनी लसीकरणानंतर मेंस्ट्रुअल डिसॉर्डर केला आहे."

30 ते 49 वयोगटातील तब्बल 25 टक्के महिलांनी लसीकरणानंतर पिरीयड्स संदर्भात समस्यांचा सामना केला. यामध्ये ब्लिडींग फ्लो, पिरीयड्स वेळेवर न येणं त्याचप्रमाणे पोटदुखी या तक्रारींचा समावेश असण्याची शक्यता आहे. 

यासंदर्भात झी 24 तासशी बोलताना डॉ. कोमल चव्हाण म्हणाल्या, "कोरोनाची लस घेतल्यानंतर मासिक पाळीसंदर्भात समस्या उद्भवत नाहीत. त्यामागे कोणताही पुरावा नाही. अशी प्रकरणं देखील पाहिलेली नाहीत."