मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक सतत चहा पित असतात. पण सतत चहा पिणे आरोग्यास फार धोकादायक असतं. तर काहींना सतत कॉफी पिण्याची सवय असते. पण काही औषधी पदार्थांपासून तयार केलेला चहा प्यायल्यास तो आरोग्यास लाभदायक ठरेल. कोणत्या पदार्थांच्या मदतीने चहा बनवाल वाचा.
दालचीनी आणि चहा
दालचीनीचा चहा तुमचं वजन कमी करतोच पण त्याचबरोबर शरीरातील 'मेटाबॉलिजम' वाढवण्यास देखील मदत करतो. कसा कराल दालचीनी चहा? उकळलेल्या पाण्यात दालचिनी पावडर किंवा दालचीनीची एक काडी टाका. त्यानंतर चहाचे सेवन करा.
आल्याचा दहा
आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.
लिंबूचा चहा
एक कप पाण्यात आलं, काळीमिरी, लवंग घालून उकळा. त्यात अर्धा लिंबू पिळा. हा चहा दिवसातून कमीत कमी तीनदा घ्या. याशिवाय दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा दूधात घालून प्या.