गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा झपाट्याने वाढ आहे. अशातच अनेकांना उन्हाचा त्रास होत आहे. उष्माघाताच्या त्रासाने अनेकांना असह्य झालं आहे तसेच डिहायड्रेशनमुळे देखील लोकं आजारी पडत आहे. असं सगळं असताना उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न सामान्यांना पडत आहे. पाणी कमी प्यायल्यामुळे फक्त त्वचेलाच त्रास होतो असं नाही तर बीपी, पोटाचे आजार, डोकेदुखी तसेच अनेक समस्या जाणवतात. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास टिप्स.
ऋजुताच्या म्हणण्यानुसार, आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने घालून आंघोळ केल्यास उन्हाच्या अनेक समस्या कमी होतील. कडुलिंब हे अँटीबॅक्टेरियल आहेत. यामुळे घामोळ्यांपासून बचाव होतो. तसेच केसांमध्ये कोंडा, चेहऱ्यावरील मुरुम, पिंपल्स, ब्लॅक हेड्स कमी होतात. त्यामुळे आंघोळीच्या काही मिनिटे अगोदर कडुलिंबाची पाने गरम पाण्यात घालावीत.
उन्हाळ्यात पोट आतून थंड राहणे अतिशय आवश्यक आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने पचनक्रिया उत्तम राहण्यासाठी दही आणि ताक पिण्याचा सल्ला दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे दुपारच्या जेवणा दरम्यान दही, ताक खावे. एवढंच नव्हे तर हे दुपारच्या जेवणात घेतल्याने गोड खाण्याची क्रेविंग कमी होते.
वाळा म्हणजेच खस या औषधी वनस्पतीच्या पाण्याचे सेवन केल्याने फायदा होतो. या पाण्यामुळे पोट थंड राहतं आणि पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. तसेच तोंडातील घाणेरडा दुर्गंध देखील कमी होतो. या उन्हाळ्यात तुम्ही खसचे सरबत पिऊ शकतो. उन्हाळ्यात होण्याऱ्या त्रासापासून बचाव करण्यासाठी ऋजुताने सांगितला खास उपाय