वापरलेली चहा पावडर फेकून देऊ नका, होतील अनेक फायदे

चहा बनवून झाल्यानंतर साधारपणे चहाची पावडर फेकून दिली जाते. तुम्हीही असं करत असाल तर थांबा. चहा बनवल्यानंतर चहाची पावडर फेकून देऊ नका. कारण याचे फायदे अनेक आहेत. इतकंच नव्हे तर त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. 

Updated: Jan 4, 2018, 04:14 PM IST
वापरलेली चहा पावडर फेकून देऊ नका, होतील अनेक फायदे title=

मुंबई : चहा बनवून झाल्यानंतर साधारपणे चहाची पावडर फेकून दिली जाते. तुम्हीही असं करत असाल तर थांबा. चहा बनवल्यानंतर चहाची पावडर फेकून देऊ नका. कारण याचे फायदे अनेक आहेत. इतकंच नव्हे तर त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. 

एकदा चहा बनवल्यानंतर चहाची पावडर फेकून देऊ नका. ती चहा पावडर सुकवून तुम्ही पुन्हा वापरु शकता. याचा स्वादही तितकाच चांगला लागेल. मात्र हे ध्यानात ठेवा की चहाची पावडर उन्हात सुकवूनच पुन्हा वापरा. 

तुम्ही चहाच्या पावडरीचा वापर छोले अधिक टेस्टी बनवण्यासाठी करु शकता. याशिवाय थोडीशी चहा पावडर पाण्यात टाकून उकळा. थोडेसे पाणी काबुली चण्यामध्ये टाका. यामुळे रंग आणि चव दोन्ही येईल.

वापरलेल्या चहाची पावडर तुम्ही खत म्हणूनही वापरु शकता. उरलेली चहा पावडर गाळल्यानंतर फेकून न देता ती झाडांना घाला. यामुळे झाडांचे आरोग्य सुधारते.

चहामध्ये अँटी-ऑक्सिंडट हे गुण असतात. एखादी जखम अथवा झाल्यास त्यावर चहापावडरीचा लेप लावल्यास रक्तस्त्राव बंद होतो.

उरलेल्या चहा पावडरीमध्ये थोडीशी विम पावडर मिसळून क्रोकरी साफ केल्यास त्यांना चमक येते. 

दातदुखीचा त्रास होत असल्यास चहाची पावडर कोमट पाण्यात टाकून या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखी बरी होईल. 

चहा पावडरचा उपयोग केसांमध्ये चमक आणण्यासाठीही होतो. यासाठी उऱलेली चहा गरम पाण्यात उकळवा. हे पाणी गाळून घ्या आणि पाणी थंड करुन या पाण्याने केस धुवा.