कच्चं दूध पिणं शरीरासाठी चांगलं की वाईट? जाणून घ्या यामागचं सत्य

बरेच असे लोक आहेत. जे कच्चं दूध पिण्यावर जास्त भर टाकतात कारण त्यांचं असं मत आहे की, कच्चं दूध शरीरासाठी जास्त चांगलं आहे.

Updated: Aug 4, 2022, 08:05 PM IST
कच्चं दूध पिणं शरीरासाठी चांगलं की वाईट? जाणून घ्या यामागचं सत्य title=

मुंबई : दूध हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामुळे कॅल्शिअम आणि महत्वाचे घटक शरीराला मिळतात. म्हणूनच तर लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच दुध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. दुधाला संपूर्ण अन्न देखील म्हटलं जातं कारण, यामुळे तुम्हाला अन्न खाल्यानंतर मिळणारे सर्व पोषक घटक मिळतात, जे आपल्या शरीरासाठी फारच चांगले आहे. दुधाचा वापर अनेक प्रकारे केला जातो, काही लोक ते थेट पितात, तर काही लोक वेगवेगळ्या दुग्धजन्य पदार्थांमधून याचे सेवन करतात.

त्यात बरेच असे लोक आहेत. जे कच्चं दूध पिण्यावर जास्त भर टाकतात कारण त्यांचं असं मत आहे की, कच्चं दूध शरीरासाठी जास्त चांगलं आहे. तर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, कच्चं दूध पिणं शरीरासाठी नुकसानकार आहे. ज्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की, शरीरासाठी नक्की काय चांगलं. चला जाणून घेऊ या.

कच्चं दूध प्यायल्यास काय होतं?

सत्य हे आहे की कच्चे दूध पिणे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. अन्न आणि औषध प्रशासन, यूएस आरोग्य संरक्षण एजन्सीनुसार, कच्च्या दुधात अनेक हानिकारक जीवाणू असू शकतात जसे की Escherichia cola (E. coli) आणि Listeria, Salmonella, इत्यादी. कच्चे दूध प्यायल्याने कोणत्याही व्यक्तीला अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार उद्भवू शकते.

कच्चे दूध पिण्याचे दुष्परिणाम

कच्च्या दुधात असलेले बॅक्टेरिया आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. ज्यामुळे अतिसार, संधिवात आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात, त्याच्या सेवनाने शरीरातील ऍसिडचे प्रमाण देखील वाचते जे आरोग्यासाठी चांगले नाही.

कच्च्या दुधात घाण असू शकते

कच्चे दूध पिणे देखील हानिकारक आहे, कारण जनावराचे दूध काढल्यावर ते दूषित असतं, त्याशिवाय जर यासाठी स्वच्छ हात आणि स्वच्छ भांडी वापरली नाहीत तर दुधात घाण येऊ शकते. म्हणूनच हे आवश्यक आहे की आपण दूध उकळल्यानंतरच प्यावे, ज्यामुळे दुधातील वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)