ड्रायफ्रूट्स खा आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारा..कधीच लागणार नाही चष्मा

  ड्रायफ्रूट्स खाणं शरीराच्या वाढीसाठी सर्वात उत्तम मानलं जात ड्रायफ्रूट्समधून शरीराला उपयुक्त असे असे पोषक तत्व मिळतात म्हणून ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. ड्रायफ्रुटचा सर्वात जास्त फायदा डोळ्यांना देखील होतो.ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि परिणामी चष्मा लागण्यापासून मुक्ती मिळू शकते..चला जाणून घेऊया डोळ्यांसाठी कोणते ड्रायफ्रूट्स आहेत फायदेशीर 

Updated: Aug 4, 2022, 07:37 PM IST
ड्रायफ्रूट्स खा आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारा..कधीच लागणार नाही चष्मा  title=

EAT DRYFRUITS FOR BETTER EYESIGHT:  ड्रायफ्रूट्स खाणं शरीराच्या वाढीसाठी सर्वात उत्तम मानलं जात ड्रायफ्रूट्समधून शरीराला उपयुक्त असे असे पोषक तत्व मिळतात म्हणून ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. ड्रायफ्रुटचा सर्वात जास्त फायदा डोळ्यांना देखील होतो.ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि परिणामी चष्मा लागण्यापासून मुक्ती मिळू शकते..चला जाणून घेऊया डोळ्यांसाठी कोणते ड्रायफ्रूट्स आहेत फायदेशीर 

अक्रोड  (Walnut)

अक्रोड दिसायला जरी छोटे असले तरी त्याचे फायदे खूप आहेत छोट्याश्या दिसणाऱ्या अक्रोडमध्ये एक नाही तर अनेक गुणधर्म आहेत जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत .दररोज अक्रोड खाल्ल्याने डोळ्यांच्या आजूबाजूच्या पेशींना आणि स्नायूंना आराम मिळतो  यात विटामिन्स, कार्बोहाइड्रेट्स, कल्शियम, आयरन, फॉस्फोरसचं प्रमाण जास्त असतं जे दृष्टी सुधारण्यास खूप फायदेशीर आहे.

बदाम  (Almonds) 

खरतर बदाम हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे हे आपण सर्वच जाणतो पण डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास ते तितकंच महत्वाचं आहे.बदाममध्ये विटामिन-ई भरपूर प्रमाणात असतं त्याचसोबत बदाममध्ये  प्रोटीनचंही प्रमाण जास्त असतं  राञी भिजवून सकाळी बदाम खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते पण बदाम योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजेत प्रमाणापेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने पोट वाढू शकतं. 

जर्दाळू  (Apricots)

जर्दाळूमधे बीटा कॅरेटिनंच प्रमाण असतं जे दृष्टी वाढवण्यात फायद्याचं समजल यामुळे डोळ्यांचं एजिंग रोखण्यास  मदत होते  याशिवाय जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चं प्रमाण असतं त्याचसोबत झिंक आणि कॉपर देखिल असतं