रक्त वाढवण्यासोबत या '5' फायद्यांंसाठी चणा डाळ फायदेशीर

चांगल्या आरोग्यासाठी पोषक आणि संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे. 

Updated: Jul 24, 2018, 08:20 PM IST
रक्त वाढवण्यासोबत या '5' फायद्यांंसाठी चणा डाळ फायदेशीर  title=

मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पोषक आणि संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे. आहारात शाकाहार आणि मांसाहाराचा समावेश करत तुम्ही आवश्यक घटकांचा आहारात समावेश करू शकता. शाकाहार्‍यांना प्रोटीनचा मुबलक पुरवठा डाळींमधून होतो. त्यामुळे आहारात सार्‍यांच डाळींचा समावेश करणं आवश्यक आहे. 

भारतामध्ये अनेक डाळी, धान्य आहेत. मात्र आपल्या जेवणाच्या ताटात काही ठराविकच डाळी आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने चण्याची डाळ आवश्यक आहे. सुमारे 100ग्राम चणा डाळीत 33000 कॅलरीज आणि 11 ग्राम फायबर आणि प्रोटीन घटकही मुबलक असतात. 

चण्याच्या डाळीचे फायदे - 

चण्याच्या डाळीमध्ये झिंक, कॅल्शियम, प्रोटीन, फोलेट घटक मुबलक असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते.

चण्याची डाळ शरीरात आयर्नची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. यामुळे हिमोग्लोबीनची पातळी सुधारण्यास मदत होते. अमायनो अ‍ॅसिड रक्तपेशींना मजबुत  करतात. हिमोग्लोबीनची पातळी सुधारल्यानंतर रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. 

फायबरचा मुबलक साठा असल्याने कोलेस्ट्रेरॉलची पातळी सुधारण्यास मदत होते. पचनसंस्थेचे कार्यदेखील सुरळीत होण्यास मदत होते. 

चण्याच्या डाळीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात राहतो. काविळच्या त्रासामध्येही चणाडाळ फायदेशीर आहे. 

मधुमेहींसाठीदेखील चणाडाळ फायदेशीर आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी चणाडाळ मदत करते. 

सौंदर्य खुलवण्यासाठी चणाडाळीचं पीठ म्हणजेच बेसन अत्यंत रामबाण घरगुती उपाय आहे.