सकाळच्या 'या' 5 पेयांचे सेवन करून वजन कमी करा, जाणून घ्या

 वाढलेले  वजन कमी करायचे, रोज सकाळी फक्त ही 5 पेय घ्या 

Updated: Jul 26, 2022, 05:25 PM IST
सकाळच्या 'या' 5 पेयांचे सेवन करून वजन कमी करा, जाणून घ्या title=

मुंबई : सकाळचा आहार आणि पेय वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर सकाळी या 4-5 गोष्टी घाला आणि एक दिवस बदलून हे पाणी प्या. हे तुमच्या शरीरावर लगेच परीणाम करतील. त्यामुळे सकाळचे पेय कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

'हे' पेय घेऊन बघा

  • वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिणे सर्वात महत्वाचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास कोमट पाण्यात 1 लिंबाचा रस टाकून प्यावा.
  • जर तुम्हाला आम्लयुक्त अन्नाची ऍलर्जी असेल तर तुम्ही गरम पाण्यात १ चिमूट हळद मिसळून हे पाणी प्यावे.
  • वजन कमी करण्यासाठी रात्री 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा जिरे भिजवा. सकाळी कोमट गाळून प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
  • काही समजत नसेल तर सकाळी 1 ग्लास गरम पाणी घेऊन त्यात कढीपत्त्याची 5 पाने किंवा कडुनिंबाची 5 पाने चावून खावीत.
  • वजन कमी करण्यासाठी, 1 तमालपत्र घ्या, ते 1 ग्लास गरम पाण्यात टाका आणि 2 मिनिटे उकळवा. आता ५ मिनिटे झाकण ठेवा. हे पाणी गाळून प्या. त्यामुळे वजन कमी करण्यात खूप मदत होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)