Remove Tan: तुमचे हात सुंदर आणि मुलायम होण्यासाठी कॉफीत ही वस्तू मिसळा आणि हातांना लावा, पाहा चमत्कार

Home Remedies For Tannning: प्रत्येकाळा आपल्या त्वचेची काळजी असते. मात्र, तुमच्या हाताची त्वचा एकदम मुलायम आणि सुंदर होण्यासाठी एक गोष्ट केली तर तुमचे काम अधिक सोपे होईल. जर तुमचे हात देखील टॅनिंगमुळे काळे झाले असतील तर तुम्ही स्वयंपाकघरातील कॉफीमध्ये ही एक गोष्ट मिसळा आणि पाहा चमत्कार. तुमच्या हाताचा काळेपणा दूर होऊन हात मऊ आणि चमकदार होतील.

Updated: Nov 1, 2022, 08:32 AM IST
Remove Tan: तुमचे हात सुंदर आणि मुलायम होण्यासाठी कॉफीत ही वस्तू मिसळा आणि हातांना लावा, पाहा चमत्कार title=

Hand Tanning Home Remedies: तुमच्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी एक सोपी आणि घरगुती पद्धत आहे. हात सुंदर आणि मुलायम होण्यासाठी कॉफीत ही वस्तू मिसळा आणि हातांना लावा, पाहा चमत्कार. तुमचे हात एकदम सुंदर होतील. शिवाय मुलायमही होतील. उन्हाळ्यात उन्हात बाहेर पडताना लोक तोंडाला स्क्राप गुंडाळतात जेणेकरुन चेहरा निस्तेज होऊ नये, तर हात आणि पायांसाठी काहीही करत नाहीत. अनेकवेळा थंडी आणि उन्हामुळे अनेकांचे हातपाय काळे होऊ लागतात. चेहरा सुंदर आणि ग्लोइंग करण्यासाठी सर्वच लोक अनेक प्रकारे क्रीम्स आणि प्रोडक्ट्सचा वापर करतात, पण हातांची योग्य काळजी घेत नसतात. हात काळे पडल्यामुळे तुमचे सौंदर्य कमी होते. शरीराच्या इतर भागापेक्षा जास्त टॅनिंग हातात असल्याने ते बाजूने दिसते. अशा परिस्थितीत हातातून टॅनिंग काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. टॅनिंग दूर करण्यासाठी आम्ही एक सोपा उपाय सांगत आहोत. त्यासाठी कॉफीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी मिसळून ही रेसिपी तयार करु शकता.  

कॉफी आणि दही
हाताचा काळेपणा दूर करण्यासाठी कॉफी पावडर, दही आणि गुलाबजल आवश्यक आहे. तिन्ही गोष्टी एका वाडग्यात एकत्र घ्या आणि ते व्यवस्थित मिसळा आणि किमान 20 मिनिटे हातावर चांगले लावा. ते सुकल्यावर हात धुवा. त्यानंतर हाताला मॉइश्चरायझर लावा.

कॉफी आणि लिंबू
ही रेसिपी तयार करण्यासाठी तुम्हाला कॉफी पावडर, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी लागेल. ते बनवण्यासाठी एका भांड्यात कॉफी पावडर, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली पेस्ट हातावर किमान 25 मिनिटे लावा, नंतर धुवा.

कॉफी आणि मध
हातांची टॅनिंग दूर करण्यासाठी एका भांड्यात थोडी कॉफी पावडर, मध आणि गुलाबपाणी टाका. नंतर तिन्ही गोष्टी नीट एकत्र मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 मिनिटे हातावर लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने हात धुवा. मग पाहा तुमच्या हाताची त्वचा कशी चमकदार आणि मुलायम होते ती.

(Disclaimer:  येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.ZEE 24 TAAS  याची पुष्टी करत नाही.)