Dates Benefits Video: रोज सकाळी 4 भिजवलेले खजूर खा आणि हेल्दी राहा

Soaked Dates : अनेकांना माहिती असेल आम्ही पण तुम्हाला सांगितलं होतं की, काळा मनुका (Black Manuka Benefits) आणि बदाम ( Benefits of Almonds) हे भिजवून खाल्ले तर आरोग्यास खूप फायदे होतात. पण तुम्हाला माहिती आहेत का?  खजूर हे देखील भिजवून खाल्ल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होतो ते...

Updated: Nov 1, 2022, 08:03 AM IST
Dates Benefits Video: रोज सकाळी 4 भिजवलेले खजूर खा आणि हेल्दी राहा title=
Benefits Of Eating Soaked Dates every morning nmp

Eating Soaked Dates every morning : धकाधकीच्या आयुष्यात आज प्रत्येक जण नोकरीसाठी घराबाहेर पडतात. त्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या महासंकटाने सगळ्यांना चिंतेत टाकलं आहे. जर या धावत्या जगासोबत आपल्यालाही धावायचं असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यात थोडे फार बदल करणे महत्त्वाचे आहे. अनेकांना माहिती असेल आम्ही पण तुम्हाला सांगितलं होतं की, काळा मनुका (Black Manuka Benefits) आणि बदाम ( Benefits of Almonds) हे भिजवून खाल्ले तर आरोग्यास खूप फायदे होतात. पण तुम्हाला माहिती आहेत का?  खजूर हे देखील भिजवून खाल्ल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होतो ते...हो खजूर देखील भिजवून खाल्ल्यास (Dates Benefits In Marathi) आरोग्यास अनेक फायदे (Many health benefits) होतात. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर दिक्षा भावसार (Doctor Diksha Bhavsar) यांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) भिजवलेले खजूर (Soaked Dates) खाण्याचे फायदे सांगितले आहेत. रात्री भिजवून ठेवलेले काळा मुनका, बदाम आणि खजूर सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी खाल्ल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. अनेकांना वाटतं की खजूर हे आपल्या शरीरासाठी गरम असतं. पण हा समज चुकीचा आहे. खजूर हे आपल्या शरीरासाठी अतिशय थंड आणि सुखदायक असतं. (Benefits Of Eating Soaked Dates every morning nmp) 

खजूर खाण्याचे फायदे (Benefits of eating dates)

खजूर केवळ खाण्यासाठीच स्वादिष्ट नसून आपल्याला अनेक फायदेही देतात.

1. बद्धकोष्ठतेची समस्या टळते.
2. हृदयाचे आरोग्य सुधारते.
3. निरोगी कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
4. हाडांचे आरोग्य सुधारते.
5. रक्तदाब नियंत्रित करते.
6. स्त्री आणि पुरुष दोघांची लैंगिक शक्ती वाढवते.
7. मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते .
8. थकवा दूर करते.
9. अशक्तपणा दूर करण्यासाठी फायदेशीर. 
10. वजन वाढण्यास फायदा.
11. मूळव्याध प्रतिबंधित करते.
12. जळजळ प्रतिबंधित करते.
13. निरोगी गर्भधारणेसाठी फायदेशीर.
14. त्वचेसाठी आणि केसांसाठी सर्वोत्तम .

खाण्यासाठी सर्वोत्तम वेळ (best time to eat)

1. सकाळी रिकाम्या पोटी.
2. दुपारचे जेवण म्हणून.
3. मिठाई खावीशी वाटेल तेव्हा.
4. झोपताना तुपासह (वजन वाढवण्यासाठी).

किती प्रमाणात खाल्ले पाहिजे? 

दोन खजूरने सुरुवात करावी. त्यानंतर रोज दिवसातून भिजवलेले 4 खजूर खावे. 

भिजवून खाण्यामागे कारण? (Why You Should Eat Dates)

खजूर भिजवल्याने त्यातील टॅनिन्स/फायटिक ऍसिड निघून जातं ज्यामुळे आपल्याला त्यातील पोषकद्रव्ये सहज शोषून घेणे सोपे जातं. भिजवल्याने ते लहान होतात आणि पचायला सोपे जातात.  त्यामुळे जर तुम्हाला खजूर चाखायचा असेल आणि त्यातून मिळणारे पोषणही शोषून घ्यायचे असेल, तर त्या खाण्यापूर्वी रात्रभर (8-10 तास) भिजवून ठेवा.

मुलांसाठी खजूर उत्तम (Dates are good for children)

खजूर मुलांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम आहेत. ज्यांचे वजन कमी आहे, कमी हिमोग्लोबिन आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना दररोज एक गोड खजूर देणे खूप उपयुक्त आहे. हे किमान 2-3 महिने सलग खाल्ल्यास याचा फायदा दिसतो.