न्याहरीला पिताय मिल्कशेक तर सावधान

काही पेय आपल्या शरीराची चरबी सुद्धा वाढवतात.

Updated: Aug 8, 2019, 06:50 PM IST
न्याहरीला पिताय मिल्कशेक तर सावधान title=

मुंबई : रोज सकाळची न्याहरी अगदी पोटभर करावी त्यामुळे दिवसभर मानसिक आणि शारीरिक मेहनतीसाठी ऊर्जा मिळते. म्हणूक कित्येक लोक आपल्या न्याहरीमध्ये एखाद्या पेयाचा देखील समावेश करतात. पण काही पेय आपल्या शरीरिरास घातक ठरू शकतात. परंतू भरपूर प्रमाणात ऊर्जा देणारे काही पेय आपल्या शरीराची चरबी सुद्धा वाढवतात. जर तुम्हाले वजन नियंत्रीत ठेवायचे असेल तर काही ड्रिंक्सचे सेवन करने नक्की टाळा.

बनाना मिल्कशेक :- केळ्यामध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. मात्र त्यात कॅलरीजही भरपूर प्रमाणात असतात. केळ्यामध्ये १०० किंवा त्यापेक्षा जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे न्याहरीला बनाना मिल्कशेक घेणं टाळावं.

चॉकलेट मिल्क :- दुधात चॉकलेट पावडर मिक्स करून पित असाल, तर तुमचं वजन अधिक वाढते. दुधापेक्षा चॉकलेटमध्ये जास्त कॅलरीज असतात. चॉकलेट मिल्कच्या एका ग्लासातून २०० ते २५० कॅलरीज मिळतात. त्यामुळे चॉकलेट मिल्क पिऊ नका.

दही :- दह्यात प्रोटिन जास्त आणि फॅट कमी असतं. मात्र अनेकदा सकाळी न्याहरीत अनेक जण दह्याचं सेवन करतात. मात्र नाश्त्यात मॉर्निंग ड्रिंक म्हणून घेतल्या जाणाऱ्या दह्यात कॅलरीज, साखर आणि फॅट असते. त्यामुळे अशा दह्याचं सेवन टाळा.