Mental Health: तुमची जवळची व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे का? 'या' लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या

Symptoms of Mental Disorder: मानसिक आजारांचे आव्हान हे वाढ लागेल आहे. एकीकडे लोक मानसिक आरोग्यासाठी (Mental Health Awareness) समुपदेशनाची मदत घेताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांच्या आयुष्यातील मानसिक समस्यांचे निराकारण होणंही गरजेचे आहे. तेव्हा मानसिक आजारांच्या (What are the Symptoms of Mental Disorder) लक्षणांकडे लक्ष देऊ नका. 

Updated: Apr 23, 2023, 10:59 AM IST
Mental Health: तुमची जवळची व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे का? 'या' लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या title=

Symptoms of Mental Disorder: मानसिक आजार हा सध्याच्या जगाचा गंभीर विषय झाला आहे. वाढती स्पर्धा, बदलतं समाजकारण, राजकारण, जीवनशैली, आरोग्य आणि लग्नसंस्था यांमुळे फार मोठ्या प्रमाणात अनेकांना मानसिक आजारांना सामोरे जावे लागते आहे. त्यातून हा मानसिक आजार (Mental Health Awareness) वाढण्याचे प्रमाण हे तरूणांमध्ये जास्त आहे. आजच्या तरूणाईपुढे अपेक्षांचे ओझे, स्पर्धा, आर्थिक उद्दिष्टे, रिलेशनशिप्स आणि करिअर या सर्वांचे आव्हान आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मानसिक आरोग्याला जपणेही आवश्यक ठरले आहे.

आपल्या कुटुंबांतील व्यक्तीही मानसिक आजारांचा बळी ठरू शकते परंतु अशावेळी आपल्या आप्तांना आणि मित्रपरिवाराला सांभाळून घेणे आवश्यक ठरते. तेव्हा जर का तुमच्या परिवारातील कोणा एका व्यक्तीला मानसिक आजार आहे असं वाटतं असेल तर वेळीच ही लक्षणे (Youth and Mental Health) ओळखा आणि त्या व्यक्तीला सहकार्य करा. (mental health dont ignore to these Mental Disorder Symptoms)

आपल्या आजूबाजूच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ही अनेकदा मानसिक आजारांसाठी कारणीभूत ठरतात. ही आजार अनुवांशिकही असू शकतो. परंतु त्याकडे दुर्लेक्ष करून चालणार नाही. आज जगासमोरील आव्हानं आहे ते म्हणजे डिप्रेशन - उदासिनता. हा आजार अधिक बळकावला तर त्याचे पर्यवसन म्हणजे आजारानं त्रस्त असलेली व्यक्ती ही स्वत:च्या जीवाचे काहीतरी बरेवाईटही करून घेऊन शकते. अशावेळी त्यांना सांभाळणंही मुश्किल होऊ जाते. तेव्हा जाणून घ्या की नक्की मानसिक आजारांची लक्षणे काय असतात? 

सध्या कामाचा ताण हा वाढू लागला आहे तेव्हा अनेक स्ट्रेस आणि चिंता या मानसिक विकारांना ग्रासायला सुरूवात केली आहे. तुम्हाला माहितीये का की यामध्ये अॅनझायटी डिसॉडर (Anxiety Disorder) हा विकार वाढू शकतो. चिंता करणं आणि सतत भविष्याबद्दल चिंताग्रस्त राहणं यामुळे लोकांमध्ये ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा अशावेळी आपल्याला आपल्या विचारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

अॅनझायटी डिसॉडरची लक्षणे काय? 

यामध्ये नको ते विचार सतत येत राहतात. खूप थकवा येतो. चिडचिड होते, काळजी आणि चिंता वाटत राहते. मनं दु:खी आहे असे वाटते. 

मानसिक आजाराची लक्षणे काय? 

  • 1. मानसिक आजारानं ग्रासल्यावर मनावरचा ताबा उडून जातो. कशातच मनं लागत नाही. आजूबाजूच्या व्यक्तींशी बोलणंही फार तणावपुर्ण वाटू लागते. 
  • 2. आपल्याला कोणत्याच गोष्टी रस वाटत नाही. विचार करून करून डोकं दुखायला लागते. सतत मुड स्विंग्स होतात आणि सतत दुखी असल्यासारखे वाटते. 
  • 3. आपल्या वागणूकीतही बदल होऊ लागतात. कधी कधी लोकं ही एकटीच बडबडू लागतात. सतत गोंधळ आणि बोलण्यात अडचण वाटू लागते. हातापायाला घामही फुटू लागतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)