Liver Detox Tips in Marathi: उन्हाळ्यात आपल्यालाही भरपूर पाणी पिणं गरजेचे असते. त्यातून आपल्याला जर (How to keep Liver healthy in Summer) का आपलं शरीर तंदुरूस्त ठेवाचे असेल तर आपल्या रोज लघवीही साफ होणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्हाला यकृत स्वच्छ आणि तंदुरूस्त ठेवणंही तितकेच महत्त्वाचे असते. मुळात आपल्याला आपल्या आहाराकडे लक्ष (Diet to keep Liver Healthy) देणे अत्यंत आवश्यक असते. बाहेरचे अरबट सरबट खाऊन ज्याप्रमाणे आपल्या पोटाला त्रास होतो त्याप्रमाणे आपल्या शरीरातील इतर अवयवांवरही होतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की तुम्ही लिव्हर डिटॉक्स करू शकता? तुम्ही अनेक सोप्या टीप्स फॉलो करू शकता.
आपल्या शरीरात आपल्या कळत नकळत अनेक विषारी पदार्थ तयार होतात तेव्हा अशावेळी आपल्याला योग्य ती काळजी घेणेही आवश्यक असते. आपल्याला त्यासाठीच आपलं शरीर डिटॉक्स करणे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु तुम्ही योग्य आणि आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करत तुमचं यकृतही सुदृढ ठेवू शकता. आपल्याला आपलं यकृत स्वच्छ आणि निरोगी ठेवणे (How to Detx Liver) आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही अनेक घातक रोगांपासून स्वत:चे रक्षण करू शकता.
1. आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. पालेभाज्या खाण्यावर तुम्ही भर देऊ शकता. यात पालकाचाही समावेश करू शकता.
2. फळांचे सेवन करा, ज्यात तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळेल अशा फळांचा समावेश करा.
3. हळद - तुमच्या आहारात तुम्ही हळदीचा वापर वाढवू शकता. हळद ही गुणकारी असते. मुळात हळद ही जंतूनाशक असते. तेव्हा लिव्हर डिटॉक्सिफिकेशनसाठी हळद हा चांगला पर्याय ठरू शकतो.
4. फाईटोन्यूट्रिएंट्स ज्यातून मिळतील अशा फळांचे सेवन करा. उदाहरणार्थ, लिंबू, संत्र इत्यादी.
5. तुम्ही मासे आणि अंडीही खाऊ शकता.
यकृत साफ ठेवण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या. तुम्ही जास्त कोल्डड्रिंक पिणं शक्यतो टाळा. त्यातून तुम्हाला जर पोटदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. पहिली गोष्ट म्हणजे यकृत खराब झाले असेल तर वेळीच लक्षणे ओळखा आणि आपला डाएट प्लान बदला. कारण आपल्या खाण्यात काही अरबट सबरट आले तर त्याचा त्रास तुम्हालाही होऊ शकतो. तेव्हा यकृत स्वच्छ ठेवणे हे गरजेचे आहे. टेस्ट केल्यानंतर तुम्हाला यकृताचा काही त्रास आहे का हे कळू शकते. लक्षणांकडे दुर्लेक्ष करू नका अन्यथा त्रास सहन करावा लागू शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)