वयाच्या ३० वर्षानंतर प्रत्येक पुरुषाने 'ही' चाचणी करून घ्यावी, आरोग्य राहीलं चांगलं

वयाच्या तिशीनंतर प्रत्येक पुरुषांमागे अनेक आजारांच संकट मागे लागते. 

Updated: Jun 3, 2022, 09:41 PM IST
वयाच्या ३० वर्षानंतर प्रत्येक पुरुषाने 'ही' चाचणी करून घ्यावी, आरोग्य राहीलं चांगलं  title=

मुंबई : वय जसं जंस वाढत जातं तस तस प्रत्येकालाच आजारांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. खासकरून वयाच्या तिशीनंतर प्रत्येक पुरुषांमागे अनेक आजारांच संकट मागे लागते. अशा परिस्थितीत पुरुषांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. अशा परिस्थितीत पुरुषांनी काही आरोग्याच्या तपासण्या केल्यास अनेक आजारांपासून त्यांची लवकर सुटका होईल. चला तर जाणून घेऊयात नेमक्या या चाचण्या कोणत्या आहेत त्या.

डायबिटीज 
मधुमेह हा काही सामान्य आजार नाही, ज्यामुळे तुम्ही इतर अनेक आजारांना बळी पडू शकता.मधुमेहाच्या या चाचणीवरून तुम्हाला मधुमेह आहे किंवा नाही हे कळते. अशाप्रकारे, जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही त्यावर वेळीच नियंत्रण मिळवू शकता. 

एचआयव्ही

एचआयव्हीला सर्वोत्तम चाचणी मानली जाते.  ही एक साधी रक्त तपासणी आहे.यामध्ये अनेक प्रकारच्या चाचण्या करता येतात. पुरुषांनी दर 5 वर्षांनी ही चाचणी करत खात्री करणे गरजेचे आहे.  

टेस्टिक्युलर कॅन्सर
टेस्टिक्युलर कॅन्सर हा 20 ते 39 वयोगटातील पुरुषांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य आजार आहे. जर हा रोग झाल्याचे वेळेत कळाल्यास त्यावर सहजपणे नियंत्रण मिळवता येणार आहे. जरी वेदना आणि सूज ही एकमेव लक्षणे असली तरी, तुम्ही ते तपासले पाहिजे. 

कोलेस्टेरॉल
कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराचे प्रमुख कारण मानले जाते.म्हणून जर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास किंवा रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या हृदयाची नियमित तपासणी करून घ्यावी. यावरून तुमच्या हृदयाच्या आरोग्याची कल्पना येईल.

दातांची तपासणी 
दातांच्या समस्या आणि हृदयविकाराचा थेट संबंध आहे. जेव्हा तोंडात असलेले बॅक्टेरिया रक्ताद्वारे शरीरात जातात, तेव्हा ते हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होऊ शकते. म्हणूनच पुरुषांनी वर्षातून दोनदा दातांची तपासणी केली पाहिजे.