Pulses for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आजकाल नवीन नवीन डाएट आलेले आहेत. फक्त दोन वेळा जेवा आणि वजन कमी करा. तर फक्त लिक्विड डाएटवर झपाट्याने वजन कमी करता येईल. कोणी म्हणतं भाकर खा आणि कोणी म्हणतं डाळभात खाऊन नका. मग नेमकं करायचं तरी काय. तुम्हाला माहिती आहे डाळ खाऊन तुम्ही झपाट्याने वजन कमी करु शकता. (Weight Loss Tips in Marathi)
आजच्या युगात वजनाच्या बाबतीत प्रत्येक जण जागृत झाले आहेत. जीम आणि योगा करुन प्रत्येक जण आपलं वजन नियंत्रणात ठेवतं. पण नुसतं व्यायाम करुन वजन कमी करता येतं नाही. योग्य आणि पौष्टिक आहाराची पण तेवढीच गरज असते. वजन कमी करण्यासाठी अनेक जण घरगुती उपाय वापरतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की डाळ खाऊन तुम्ही झपाट्याने वजन कमी करु शकता. (masoor dal for weight loss)
प्रत्येकाच्या घरात तूर आणि मूग दाळ असतेच. तर अनेकांकडे या दोन डाळीशिवाय मसूरची डाळही बनवली जाते. या मसूर डाळेचे वजन कमी करण्यासाठीचे फायदे जाणून तुम्ही अवाक् व्हाल. मसूर डाळला अनेक महिला लाल डाळही म्हणतात. ही चवीला स्वादिष्ट अशी पौष्टिक डाळ आहे. (masoor Dal Good For Weight Loss health news in marathi )
तुम्हाला माहिती आहे, 1 कप मसूर डाळीमध्ये 180 कॅलरीज, 10 ग्रॅम प्रथिने आणि 6 ग्रॅम फायबर असतात. अशी ही मसूर डाळ वजन कमी करण्यासाठी कशी फायदेशीर आहे ते पाहूयात. मसूर डाळामध्ये कमी चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट असून तिच्यामध्ये उच्च फायबर आहे.
त्यामुळे ही डाळ खाल्ल्याने तुमची पचन क्षमता मंद होते आणि यामुळे वजन कमी करण्यास फायदा होता. आरोग्य तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी मसूर डाळीचं सेवन करण्यास सांगतात.
मसूर डाळमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीकार्सिनोजेनिक, हायपोलिपिडेमिक आणि अँटीडायपेटिक हे गुणधर्म असतात. त्यामुळे याचे आरोग्यास खूप फायदे होतात.
1. मधुमेह नियंत्रण ठेवण्यास मसूर डाळ मदत करते.
2. कर्करोगापासून दूर ठेवण्यासाठी मसूर डाळ चांगली आहे.
3. हृदय निरोगी ठेवण्यासाठी मसूर डाळ मदत करते.
जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर मग मसूर डाळ योग्य पद्धतीने खाणं गरजेचं आहे. मसूर डाळ शिजवण्यापूर्वी किमान 4 - 5 तास भिजवायला पाहिजे. त्यामुळे डाळीतील पोषक घटक वाढतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)