Full Body Pain: तुमचं संपूर्ण शरीर दुखतं का? हे कारण असू शकते

हात, पाय, गुडघे, कंबर, पाठदुखी या अनेकांच्या तक्रारी असतात. पण काही लोकांना संपूर्ण शरीरात वेदना होतात.

Updated: Jun 14, 2022, 08:35 PM IST
Full Body Pain: तुमचं संपूर्ण शरीर दुखतं का? हे कारण असू शकते title=

Full Body Pain: हात, पाय, गुडघे, कंबर, पाठदुखी या अनेकांच्या तक्रारी असतात. पण काही लोकांना संपूर्ण शरीरात वेदना होतात. यामागे काय कारण असू शकते माहीत आहे का?  संपूर्ण शरीरात वेदना होण्याचे कारण काय असू शकते आणि त्यावर उपचार काय आहेत? नाही तर जाणून घ्या.

तणाव

तणाव हा शरीरात तीव्र वेदना होण्याचं कारण असू शकतो. तणावात शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे स्नायू कडक होऊ शकतात. यासोबतच शरीरावर जळजळ आणि संसर्गाचाही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हालाही संपूर्ण शरीरात वेदना होत असतील तर तणाव घेणे बंद करा.

डिहायड्रेशन

डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता असणे. कोणत्याही व्यक्तीला योग्यरित्या कार्य करण्यासाठी हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती डिहायड्रेटेड असते तेव्हा त्याला थकवा जाणवतो. यामुळे, संपूर्ण शरीरात वेदना जाणवू शकतात.

झोप न लागणे

निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा झोपेची कमतरता असते तेव्हा संपूर्ण शरीरात वेदना जाणवू लागतात. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा येतो. यामुळे आळशीपणा आणि जडपणा जाणवू शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसातून 8 तासांची झोप देखील घेतली पाहिजे.

उपचार

  • संपूर्ण शरीरात वेदना होत असल्यास कोमट पाण्याने आंघोळ करावी. यामुळे स्नायूंचा आणि शरीराचा ताण कमी होतो आणि शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
  • शरीरातील वेदना कमी करण्यासाठी स्वत:ला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे.
  • शरीरात वेदना होत असताना विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक असते.